IND vs ENG Test: भारताविरुद्ध 25 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वीच इंग्लंडचा संघ कर्णधार रोहित शर्मा याला घाबरलेला दिसत आहे. भारतामध्ये इंग्लंडसाठी मालिका विजयाचा हिरो ठरलेल्या माँटी पनेसर याने रोहित शर्माला जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हटले आहे. पनेसर म्हणाला की, सध्या रोहित शर्मापेक्षा धोकादायक फलंदाज कोणी नाही. रोहित शर्मामुळेच भारतीय संघ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचण्यात यशस्वी झाल्याचा दावाही पनेसरने केला.
माँटी पनेसर (Monty Panesar) याने मालिका सुरू होण्यापूर्वी रोहित शर्मा (Rohit Sharma) याचे खूप कौतुक केले आहे. पनेसर म्हणाला, प्रतिआक्रमणाच्या बाबतीत रोहित शर्मापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. 2023 च्या वनडे विश्वचषकात रोहित शर्मा कसा खेळू शकतो हे आम्ही पाहिले आहे. रोहित शर्मा एकटा संपूर्ण खेळ बदलू शकतो. रोहित शर्मामुळेच भारतीय संघाला एकदिवसीय विश्वचषकाची अंतिम फेरी गाठण्यात यश आले.
पनेसर याच्या शब्दालाही वजन आहे कारण शेवटच्या वेळी 2012 मध्ये जेव्हा इंग्लंडचा संघ भारताला मायदेशात पराभूत करण्यात यशस्वी ठरला होता, तेव्हा पनेसर त्या संघाचा एक भाग होता. यानंतर इंग्लंडच्या संघाला भारतात एकही मालिका जिंकण्यात यश आलेले नाही. 2021 मध्ये पहिल्या कसोटीत इंग्लंडने भारताला नक्कीच पराभूत केले होते. मात्र यानंतर भारताने मालिकेत दमदार पुनरागमन करत इंग्लंडचा 1-3 असा पराभव केला. भारतीय संघावर नियंत्रण ठेवू शकेल असा पनेसरसारखा फिरकी गोलंदाज सध्या इंग्लंडकडे दिसत नाही.
अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात शतक झळकावून रोहित शर्माने आपल्या फॉर्मची झलक दाखवली आहे. रोहित शर्माने 2021 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही चमकदार कामगिरी केली होती. (He is the best in the world the England team was scared of Rohit Sharma before the start of the Test series)
हेही वाचा
‘रिंकू एमएस धोनी आणि युवराज सिंगचा वारसा पुढे नेणार’, अफगाणिस्तान फलंदाजाचं भाकित
मोठी बातमी; भारताचा जावई दुसऱ्यांदा चढला बोहल्यावर, प्रसिद्ध अभिनेत्रीशी थाटला संसार, पाहा फोटो