भारतीय संघाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीवर निशाना साधताना तो खेळाडूंच्या पाठीमागे उभा रहात नसल्याचे सांगितले आहे. कोहली सतत संघात प्रयोग करत असल्यामुळे खेळाडूंच्या कामगिरीवरही त्याचा परिणाम होतं असल्याचे कैफने सांगितले.
रिषभ पंतबद्दल बोलताना कैफ म्हणाला, यष्टीरक्षक म्हणूनही विराट सतत वेगवेगळ्या खेळाडूंना संघात घेतो. भारताला एका पुर्णवेळ यष्टीरक्षकाची गरज आहे. केएल राहुला हा एक बॅकअप यष्टीरक्षक असावा. तो पुर्णवेळ यष्टीरक्षक म्हणून संघात नको. तुम्हाला जर धोनी ऐवजी रिषभ पंतला संधी द्यायची असेल तर कोहलीने त्याला पाठींबा दिला पाहिजे. तो संघातील वाॅटर बाॅय व्हायला नको.
कैफ भारताकडून एकूण १३ कसोटी व १२५ वनडे सामने खेळला असून त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.