---Advertisement---

“बाबर आझम लवकरच पुनरागमन करेल”, पाकिस्तानच्या प्रशिक्षकांनी व्यक्त केला विश्वास

On: गुरूवार, ऑक्टोबर 24, 2024 8:29 PM
Babar Azam
---Advertisement---

पाकिस्तानचा माजी कर्णधार व प्रमुख फलंदाज बाबर आझम (Babar Azam) सध्या संघाबाहेर आहे. गेल्या काही डावातील खराब कामगिरीमुळे त्याला संघातून वगळण्यात आले होते. आता तो पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड मालिकेचा भाग नाही. मात्र, संघाचे प्रशिक्षक जेसन गिलेस्पी यांना आशा आहे की, हा फलंदाज लवकरच संघात पुनरागमन करेल. ते म्हणाले की महान खेळाडू नेहमी वाईट वेळेवर मात करण्याचे मार्ग शोधतात.

इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर बाबरशिवाय शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाह यांनाही संघातून वगळण्यात आले. आता संघाच्या प्रशिक्षकाने त्यांचे लवकरच पुनरागमन होण्याची आशा व्यक्त केली आहे.

गिलेस्पी म्हणाले, “मी याचं उत्तर देऊ शकत नाही. कारण मी निवडकर्ता नाही. पण मी म्हणेन की बाबर हा महान खेळाडू आहे. माझ्या मते तो जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. त्याच्या खेळात काही कमतरता होती, असं मला वाटत नाही. जगभरातील अनेक महान खेळाडूंनी खराब कामगिरीनंतर अनेक वेळा उसळी मारली आहे.” बाबर आझमला कसोटीच्या 18 डावात एकही अर्धशतक झळकावता आले नाही. त्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले.

गिलेस्पी पुढे म्हणाले, “मला पूर्ण आत्मविश्वास आहे. बाबर पाकिस्तानसाठी सर्व फॉरमॅटमध्ये भरपूर धावा करून पुनरागमन करेल. तो खूप चांगला खेळाडू आहे. तो त्याच्या खेळावर खूप मेहनत घेतो. तो त्याच्या तयारीत अगदी काटेकोर आहे. येत्या काही काळात तो पाकिस्तानसाठी मोठी भूमिका बजावेल अशी मला पूर्ण आशा आहे.”

बाबर आणि इतर वरिष्ठ खेळाडूंना बाहेर केल्यानंतर पाकिस्तान संघाने दुसरी कसोटी जिंकली होती. त्यामुळे त्यांच्यावरील टीका अधिक वाढलेली. आता तिसऱ्या आणि निर्णायक कसोटीत दोन्ही संघ भिडताना दिसत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

सरफराज खानने आक्रमकपणे कर्णधार रोहितला डीआरएस घेण्यासाठी मनवले आणि नंतर… Video
गंभीर-रोहितमध्ये कॉमनसेन्स नाही, माजी खेळाडूचं धक्कादायक वक्तव्य
IND vs NZ; ‘या’ स्टार खेळाडूचा जलवा पाहून गावसकरांनी फिरवले शब्द, म्हणाले…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---