आगामी श्रीलंका दाैऱ्यासाठी टी20 संघाचे कर्णधारपद हार्दिक पांड्याला न देण्याचे कारण समोर आले आहे. भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी गाैतम गंभीरची नियुक्ती होताच टीम इंडिया मध्ये बदलाचे वारे वाहत आहेत. सूर्यकुमार यादवला श्रीलंका दाैऱ्यासाठी टी20 संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. तर शुबमन गिलला दोन्ही फाॅरमॅट मध्ये उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. श्रीलंका दाैऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा होताच हार्दिक पांड्याची जास्त चर्चा होत आहे. कारण त्याला कर्णधार न बनवण्याचा निर्णय खूपच आश्चर्यचकित करणारा होता.
हार्दिक पांड्याला टी20 विश्वचषक 2024 मध्ये उपकर्णधारपदाचे भूमिका दिली होती. या स्पर्धेत हार्दिकने अप्रतिम कामगिरी केला होता. त्याने फलंदाजीत 144 धावा तर गोलंदाजीत 11 विकेट्स घेतल्या होत्या. हार्दिकने कोणतही चूकीचे काम केले नाही. तर शेवटी कारण असेल की , त्याला भारतीय संघाच्या कर्णधारपदासाठी मागे करण्यात आले.
हार्दिकला कर्णधार न बनवण्यामध्ये गाैतम गंभीरचा हात?
मीडिया रिपोर्ट्सला बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, गाैतम गंभीरने स्पष्टपणे सांगितले नव्हते की त्याला सूर्यकुमार यादवला कर्णधार करायचे आहे म्हणून , पण गंभीरने असे म्हटंले होते की त्याला आश्या कर्णधाराची गरज आहे जो त्याच्या वर्कलोडमुळे हा भारतीय संघाच्या यशात अडथळा ठरू नये. अजित आगरकर यांनीही नव्या मुख्य प्रशिक्षकाची दृष्टी व्यवस्थित समजून घेतली. आणि सूर्यकुमार यादवच्या रुपात टीम इंडियाच्या टी20 कर्णधारपदासाठी नियुक्ती केली.
27 जुलै पासून सुरु होणाऱ्या श्रीलंका विरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ 22 जुलै रोजी श्रीलंकेला रवाना होणार आहे. ज्यामध्ये टीम इंडिया 3 टी20 तर 3 एकदिवसीय सामने खेळणार आहे. विशेष म्हणजे हार्दिक पांड्यांने एकदिवसीय मालिकेसाठी आपले नाव आगोदरच मागे घेतले आहे. तो व्यक्तिक कारणामुळे श्रीलंकेविरुद्धची वनडे मालिका खेळणार नसल्याचे स्पष्ट केले होते. अश्या परिस्थितीत हार्दिकने दुखापतीमुळे वनडे मालिकेसाठी ब्रेक घेतल्याचे बोलले जात होते, पण नाताशा सोबत घटस्फोटच्या पुष्टीने स्पष्ट झाले आहे की, हार्दिक पुनरागमनापूर्वी त्याला मानसिक दृष्ट्या पूर्णपणे तंदुरुस्त व्हायचे आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“ते जाणूनबुजून…”, अमित मिश्राच्या कोहलीबाबत वादग्रस्त विधानावर आता मोहम्मद शमीची तिखट प्रतिक्रिया
‘धोनी आणि रिझवान तुलना करणे म्हणजे…’, माजी क्रिकेटरनी पाकिस्तानी पत्रकराला शिकवला चांगलाच धडा
‘बुमराह नाही तर..’, हा गोलंदाज सर्वात धोकादायक, मोहम्मद शमीच्या या वक्तव्याने उडाली खळबळ