भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात आगामी 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) ही मालिका खेळली जाणार आहे. ज्याची सुरूवात (22 नोव्हेंबर) पासून होणार आहे. दोन्ही संघातील पहिला सामना पर्थच्या मैदानावर रंगणार आहे. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) वैयक्तिक कारणांमुळे पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नसणार आहे. मग रोहितची जागा कोण घेणार याबद्दल भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने (Gautam Gambhir) मोठे वक्तव्य केले आहे.
आता ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी केएल राहुलचे (KL Rahul) कौतुक केले आहे. ते म्हणाले, राहुल संघाच्या गरजेनुसार अनेक भूमिका बजावू शकतो. गौतम गंभीर म्हणाले, “त्याच्या (केएल राहुल) गुणवत्तेमध्ये तो खरोखरच सर्वात वरच्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. तो क्रमांक 3 वर फलंदाजी करू शकतो आणि तो 6 व्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. ही भूमिका साकारण्यासाठी तुमच्याकडे खूप प्रतिभा असणे आवश्यक आहे आणि तो एकदिवसीय सामन्यांमध्ये विकेटकीपिंग देखील करतो.”
पुढे बोलताना गौतम गंभीर (Gautam Gambhir) म्हणाले, “जरा विचार करा की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे किती खेळाडू आहेत जे केएल राहुलसारखे खेळू शकतात आणि गरज पडल्यास सहाव्या क्रमांकावरही खेळू शकतात. म्हणूनच मला वाटते की गरज पडल्यास तो भारतीय संघासाठी सलामी देऊ शकतो. विशेषतः रोहित शर्मा पहिल्या कसोटी सामन्यात उपलब्ध नसल्यास केएल राहुल त्याची जागा घेईल.”
बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर
बॉर्डर गावसकर मालिकेचे पूर्ण वेळापत्रक
पहिली कसोटी: 22-26 नोव्हेंबर, पर्थ
दुसरी कसोटी: 6-10 डिसेंबर, ॲडलेड (दिवस-रात्र कसोटी)
तिसरी कसोटी: 14-18 डिसेंबर, ब्रिस्बेन
चौथी कसोटी: 26-30 डिसेंबर, मेलबर्न
पाचवी कसोटी: 3-7 जानेवारी, सिडनी
महत्त्वाच्या बातम्या-
मराठमोळा आयुष आयपीएलमध्ये खेळणार! सीएसकेने ट्रायलसाठी बोलावले
“गौतम गंभीरची बोलण्याची पद्धत योग्य नाही, त्याला मीडियापासून दूर ठेवा”, संजय मांजरेकरांचा बीसीसीआयला सल्ला
काय सांगता! माजी भारतीय क्रिकेटपटूचा मुलगा लिंग बदलून मुलगी झाला