भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानचा तिसरा व अखेरचा वनडे सामना मंगळवारी (22 मार्च) खेळला जाईल. मालिका आपल्या नावे करण्यासाठी या सामन्यात विजय मिळवण्याचा दोन्ही संघ प्रयत्न करतील. चेन्नई येथील एमए चिदंबरम म्हणजे चेपॉक स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. या सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी संघाचा प्रमुख फलंदाज सूर्यकुमार यादव याच्याबाबत एक महत्त्वाचे वक्तव्य केले.
वनडे संघातील प्रमुख फलंदाज श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त असल्याने या मालिकेत सूर्यकुमार यादवला मधल्या फळीत खेळण्याची संधी मिळत आहे. मात्र, पहिल्या दोन्ही सामन्यात त्याला अपेक्षित कामगिरी करण्यात अपयश आले. मुंबई आणि विशाखापट्टणम येथे झालेल्या या दोन्ही सामन्यात तो पहिल्या चेंडूवर बाद झाला. मिचेल स्टार्कने त्याला दोन्ही वेळा पायचित केले. यामुळे त्याच्यावर टीका होताना दिसत आहे.
तिसऱ्या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत सूर्यकुमारच्या खराब फॉर्मविषयी राहुल द्रविड यांना विचारण्यात आले. त्यावर बोलताना ते म्हणाले,
“सूर्यकुमार मोठ्या प्रमाणावर टी20 आणि आयपीएल क्रिकेट खेळला आहे. तो वनडे क्रिकेट जास्त खेळला नाही. परंतु, अधिकाधिक शिकण्यावर भर देतोय. त्याच्यासारख्या गुणवत्ता असलेल्या खेळाडूला आपण थोडा अधिक वेळ द्यायला हवा. त्याच्या बाबतीत संयम बाळगणे गरजेचे आहे.”
सूर्यकुमार याची वनडे क्रिकेटमधील कामगिरी सातत्याने खराब होतेय. 2023 मध्ये खेळलेल्या 6 वनडेत तो केवळ 49 धावा करू शकला आहे. मात्र, दुसरीकडे टी20 क्रिकेटमध्ये त्याची बॅट चांगलीच बोलते. तो मागील काही काळापासून टी20 फलंदाजी क्रमवारीत अव्वलस्थानी आहे.
(Head Coach Rahul Dravid Backs Suryakumar Yadav On His Poor ODI Form)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कांगारू रोखणार टीम इंडियाचा विजयरथ? चेन्नईत रंगणार निर्णायक सामना, अशी असू शकते प्लेईंग 11
दुखापती सोडेना टीम इंडियाची ‘पाठ’! श्रेयस अय्यर तब्बल ‘इतके’ महिने क्रिकेटपासून राहणार दूर