भारतीय संघ वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज झाला आहे. मंगळवारी (१९ जुलै) भारतीय संघ त्रिनिदादमध्ये पोहोचला. या दौऱ्यात उभय संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय आणि पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाईल. निवडकर्त्यांनी एकदिवसीय मालिकेसाठी शिखर धवनच्या नेतृत्वात युवा खेळाडूंना संधी दिली आहे. दरम्यान, भारतीय खेळाडूंचा विमानतळावरील एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा नवीन अंदाज पाहायला मिळाला.
त्रिनिदादमध्ये पोहोचल्यानंतर भारतीय खेळाडू मस्ती करताना दिसले. खेळाडूंनी सोशल मीडियावरील ‘है’ ट्रेंडवर एक व्हिडिओ बनवला आहे. शिखर धवन (Shikhar Dhawan) याच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. व्हिडिओत धवनसोबत श्रेयस अय्यर, युझवेंद्र चहल, शुभमन गिल, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराजही दिसत आहेत. या सर्वांमध्ये सर्वात जास्त लक्ष जर कोणी वेधले असेल, तर ते आहेत संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid), जो व्हिडिओत सर्वात शेवटी दिसतो.
राहुल द्रविड त्याच्या शांत आणि संयमी स्वभावासाठी ओळखले जातो. चाहत्यांनी खुपच कमी वेळा द्रविडला मस्तीच्या मूडमध्ये पाहिले आहे. याच कारणास्तव धवनने शेअर केलेल्या या इंस्टाग्राम पोस्टवर लाईक्सचा पाऊस पडत आहे. चाहत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील येत आहेत. काहींच्या मते भारताच्या नव्या आणि युवा खेळाडूंसोबत राहून राहुल द्रविड पूर्णपणे बदलला आहे.
https://www.instagram.com/reel/CgMaipqJlAz/?utm_source=ig_web_copy_link
वेस्ट इंडीज दौऱ्यात भारताला पहिल्यांदा एकदिवसीय आणि नंतर टी-२० मालिका खेळायची आहे. शिखर धनव एकदिवसीय मालिकेत संघाचे नेतृत्व करेल. तर रवींद्र जडेजा संघाचा उपकर्णधार असेल. नियमित कर्णधार रोहित शर्मा उभय संघातील टी-२० मालिकेसाठी उपस्थित असेल आणि नेतृत्वाची धुरा हातात घेईल. विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहला या दौऱ्यातून विश्रांती दिली गेली आहे. २२ जुलै रोजी सुरू होणारा या दौऱ्याचा शेवट ७ ऑगस्टला होईल.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ: शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ईशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकुर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान , प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
स्टोक्सने निवृत्ती तर घेतलीच, पण जाता जाता विराटबद्दल बोलून गेला असं काही, वाचाच
बाप रे बाप ! आख्ख्या संघाने मिळून कुटल्या ३३३ धावा, पण नाही मारला एकही षटकार
शिखर धवनच्या नेतृत्वातील भारतीय संघ त्रिनिदादमध्ये दाखल, इंग्लंडनंतर वेस्ट इंडीजलाही चारणार धूळ