रविवार (दि. 22 ऑक्टोबर) हा दिवस 140 कोटी भारतीयांसोबतच जगभरातील क्रिकेटप्रेमींसाठी खूपच महत्त्वाचा आहे. यामागील कारण असे की, विश्वचषक 2023 स्पर्धेतील 21वा सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात खेळला जाणार आहे. हा सामना धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर पार पडणार आहे. या सामन्यात जो संघ जिंकेल, तो अव्वलस्थानी कायम राहील. तसं तर, उभय संघांचे सारखेच गुण आहेत, पण चांगल्या नेट रनरेटमुळे न्यूझीलंड आघाडीवर आहे. अशात भारताकडे हे स्थान पटकावण्याची संधी आहे. मात्र, त्यापूर्वी भारतीय संघात मोठे बदल होण्याची चिन्हे आहेत. याची माहिती मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने दिली आहे.
भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) दुखापतीमुळे भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) सामन्यात खेळणार नाही. तो भारतीय प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर पडल्याने संघाचे संतुलन पूर्णपणे बिघडले आहे. ही बाब राहुल द्रविड (Rahul Dravid) यानेही मान्य केली आहे. द्रविडने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात मोठ्या बदलांचे संकेत दिले आहेत.
काय म्हणाला द्रविड?
द्रविडने न्यूझीलंडविरुद्ध सामन्याच्या एक दिवसाआधीच माध्यमांशी संघातील संयोजनाविषयी आणि पंड्याच्या दुखापतीविषयी चर्चा केली. तो म्हणाला, “हार्दिक एक महत्त्वाचा खेळाडू आहे, तो संघाचे संतुलन कायम राखण्यात मदत करतो. मात्र, तो या सामन्याला मुकणार असल्याने आम्हाला पाहावे लागेल की, आमचे सर्वोत्तम संयोजन काय असेल. आम्हाला त्या 14 खेळाडूंसोबतच काम करावे लागेल, जे आमच्याकडे उपलब्ध आहेत. आम्हाला पाहावे लागेल की, या स्थितीत सर्वोत्तम संयोजन काय असू शकते.”
पुढे बोलताना द्रविड म्हणाला की, “हार्दिक आमच्या मुख्य चार वेगवान गोलंदाजांपैकी एक राहिला आहे. अशात आम्हाला पाहावे लागेल की, आम्ही कोणत्या संयोजनासह पुढे जाऊ शकतो. आम्ही तीन वेगवान गोलंदाज किंवा तीन फिरकीपटूंसोबत जाऊ शकतो. काही बाबतीत निश्चितच आमच्याकडे अश्विनसारखा खेळाडू उपस्थित आहे, जो राखीव खेळाडूंमध्ये आहे. अश्विनकडेही जबरदस्त क्षमता आहे. अशात आम्ही हार्दिकच्या परतण्यापर्यंत दोन किंवा तीन संयोजनाचा वापर करू.”
#ICCCricketWorldCup | "He (Hardik Pandya) is an important player for us and he is an important all-rounder, he will miss this game (India-New Zealand)…, " says Indian Cricket Team Head Coach Rahul Dravid https://t.co/ZPJBAbSoX8 pic.twitter.com/H38zI2q9eZ
— Rakesh Kumar (@RiCkY_847) October 21, 2023
सूर्याही दुखापतग्रस्त
हार्दिक पंड्या दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात खेळू शकणार नाही. यासोबतच आता सूर्यकुमार यादवही फलंदाजी सरावादरम्यान दुखापतग्रस्त झाला आहे. सूर्याला वेदनेने विव्हळत मैदानाबाहेर जावे लागले. सूर्या सामन्यापर्यंत फिट होतो की नाही, पे सांगणे कठीण आहे. सरावादरम्यान त्याच्या उजव्या हाताच्या मनगटाला चेंडू लागला होता, त्यानंतर त्याला तीव्र वेदना झाल्या. अशात न्यूझीलंडविरुद्ध संघात कोणते बदल होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (head coach rahul dravid big statement ahead of india vs new zealand match said this)
हेही वाचा-
दुष्काळात तेरावा महिना! दारुण पराभवानंतर इंग्लंडचे Points Tableमध्ये नुकसान, गेला दुबळ्या संघांच्याही खाली
लाजीरवाण्या पराभवानंतर बटलरचे धक्कादायक विधान; म्हणाला, ‘लय घाण हरवलं, कडक उन्हामुळे…’