---Advertisement---

भारतात कोरोनाचा प्रभाव पाहून पीटरसन झाला भावूक; म्हणाला, “ज्या देशावर मी इतके प्रेम करतो त्या देशाचे असे…”

On: मंगळवार, मे 4, 2021 8:08 PM
Kevin-Pietersen
---Advertisement---

अखेर आयपीएल 2021 मध्ये करोनाचे विघ्न पडले आहे. कोरोनामुळे अखेर ही स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. खरं तर सुरुवातीपासूनच आयपीएलच्या आयोजनासंदर्भात कोरोनाची भीती वर्तवली जात होती. तरीदेखील बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा भारतात घेण्याची योजना आखली, मात्र त्यात त्यांना अपयश आले आहे. बायोबबलमध्ये देखील कोरोनाचा शिरकाव झाल्याने खेळाडूंमध्ये काही प्रमाणात भीतीचे वातावरण असल्याची चर्चा होती व अखेर बीसीसीआय व आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने आयपीएल स्पर्धा तात्काळ रद्द करण्याचा निर्णय घेतला.

आयपीएल स्पर्धा कोरोनामुळे रद्द होणे व यासोबतच भारतातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्ययेबद्दल संपूर्ण जगभरातून भारतासाठी प्रार्थना केली जात आहे. यामध्ये आता आणखी एक नाव जोडले आहे ते म्हणजे इंग्लंडचा माजी दिग्गज क्रिकेट खेळाडू केविन पीटरसन याचे. केविन पीटरसनचे भारताबद्दल असलेले प्रेम यापूर्वीही अनेक वेळा व्यक्त झालेले आहे. आपल्या ट्विटमध्ये पीटरसनने कोरोना रुग्ण संख्येत झालेल्या वाढीबद्दल चिंता व्यक्त करत भारताला या संकटातून लवकर बाहेर पडण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या ट्विटमध्ये केविन पीटरसनने लिहिले, “भारत-ज्या देशावर मी इतके प्रेम करतो त्या देशाची अशी अवस्था बघून माझे हृदय द्रवले आहे. तुम्ही नक्कीच यातून बाहेर पडून आणखीच सशक्त बनाल. तुमची दया भावना या कठीण काळात देखील दिसून येते.”

https://twitter.com/KP24/status/1389501826148573184

पीटरसनप्रमाणे अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध व्यक्तींनी भारतासाठी प्रार्थना केलेली दिसून येते. आयपीएल 2021 स्पर्धा रद्द झाल्याने आता विदेशी खेळाडू व पीटरसनप्रमाणे समालोचन करत असलेल्या अनेकांना आपल्या देशात जाण्यासाठी काही प्रमाणात कष्ट घ्यावे लागणार आहेत. हे बघणे उत्सुकतेचे ठरेल की बीसीसीआय आयपीएल संदर्भात आगामी काळात कोणता निर्णय घेते.

महत्त्वाच्या बातम्या – 

आयपीएलदरम्यान कोरोनाबाधित झालेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी; बनू शकतो ११ जणांचा एक संघ

“खेळाडूंना मायदेशी आणण्यासाठी ऑस्ट्रेलियन सरकारकडून प्रवासबंदीत कुठलीही सूट मागणार नाही”, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केले स्पष्ट

आयपीएल तर रद्द झालीय, आता परत कधी आपण भारतीय क्रिकेटपटूंना खेळताना पाहणार? जाणून घ्या थोडक्यात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---