---Advertisement---

ऑस्ट्रेलियन कर्णधाराच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर भारतीय फलंदाजाने लिहिली हृदयस्पर्शी पोस्ट; म्हणाली, ‘या लिजेंड खेळाडूचा…’

Meg Lenning
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाची कर्णधार असलेल्या मेग लॅनिंगने गुरुवारी (9 नोव्हेंबर) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करून सर्व क्रिकेट चाहत्यांना आश्चर्यचकित केले. क्रिकेट जगतातील महान खेळाडूंमध्ये लॅनिंगची गणना केली जाते. ही बातमी समोर आल्यानंतर चाहते आणि सहकारी खेळाडू तिच्या शानदार कारकिर्दीसाठी तिचं अभिनंदन करत आहेत. यामध्ये भारतीय फलंदाज जेमिमाह रॉड्रिग्सच्या नावाचाही समावेश आहे, तिने लॅनिंगसाठी खास ट्विट केले होते.

जेमिमाह रॉड्रिग्स (Jemimah Rodrigues) म्हणाली, “या लिजेंड खेळाडूचा खूप सन्मान, मी दु: खी आहे पण त्याच वेळी मला सर्व काळातील सर्वोत्कृष्ट खेळाडूसोबत आणि विरुद्ध खेळण्याची संधी मिळाली याबद्दल मी खूप आभारी आहे. इतक्या लोकांना प्रेरणा देण्यासाठी तु जे काही केले त्याबद्दल धन्यवाद आणि मी नक्कीच त्यापैकी एक आहे. अप्रतिम कारकीर्दीबद्दल मेगचे अभिनंदन.”

मेग लॅनिंग (Meg Lanning) आणि रॉड्रिग्ज यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर एकमेकांविरुद्ध अनेक सामने खेळले आहेत हे विशेष. तर महिला प्रीमियर लीगमध्ये यष्टिरक्षक फलंदाज लॅनिंग दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार आहे, रॉड्रिग्ज देखील त्याच संघाचा एक भाग आहे. दोघींमध्ये चांगली मैत्री आहे, जी स्पर्धेदरम्यान पाहायला मिळाली.

31 वर्षीय लॅनिंग अजूनही फ्रँचायझी क्रिकेट आणि टी20 लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या हंगामासाठी दिल्ली कॅपिटल्सने तिला कायम ठेवले आहे. ती पुन्हा एकदा या स्पर्धेत दिल्लीचे नेतृत्व करताना दिसेल, अशी पूर्ण आशा आहे.

जर आपण जेमिमाह रॉड्रिग्सबद्दल बोललो तर ती शेवटची आशियाई स्पर्धेमध्ये खेळताना दिसली होती, ज्यामध्ये तिची कामगिरी उत्कृष्ट होती. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेचा पराभव करत सुवर्णपदक जिंकले होते. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर 6 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेत रॉड्रिग्स आता खेळताना करताना दिसणार आहे. (Heartwarming post by Indian batsman after Australian captain retirement announcement She said This legend player)

म्हत्वाच्या बातम्या

संपूर्ण यादी: आजपर्यंतचे महाराष्ट्र केसरी कुस्ती गदेचे मानकरी
दक्षिण आफ्रिकेचे चॅलेंज पार करण्यात अफगाणिस्तान अपयशी! बवुमा सेनेचा अखेरच्या सामन्यात विजय, डसेन-फेकलुकवायो हिरो

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---