---Advertisement---

अफलातून ! हेन्रीक्सने विराटचा घेतला जबरदस्त झेल, पाहा व्हिडिओ

On: रविवार, नोव्हेंबर 29, 2020 5:43 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना रविवारी (29 नोव्हेंबर) सिडनी क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला गेला. या सामन्यात मोझेल हेन्रीक्सने भारताचा कर्णधार विराट कोहलीचा अफलातून झेल घेतला.

ऑस्ट्रेलियाने केल्या 389 धावा

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत 50 षटकांत तब्बल 389 धावा केल्या.

विराटने विजयाच्या अशा राखल्या कायम

प्रत्युत्तरादाखल भारताला 58 धावांवर पहिला धक्का बसला. शिखर धवन 30 धावा करून तंबूत परतला.त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या विराट कोहलीने उत्कृष्ट फलंदाजी करत भारताच्या विजयाच्या आशा कायम राखल्या.

हेन्रीक्सने विराटचा घेतला जबरदस्त झेल

विराट 89 धावांवर खेळत असतानाच डावाच्या 35 व्या षटकांत वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड गोलंदाजी करायला आला. षटकाच्या 5 व्या चेंडूवर कोहलीने लॉन्ग ऑनचा दिशेने फटका मारला. चेंडू काही काळ हवेत होता त्यामुळे 30 यार्ड मध्ये क्षेत्ररक्षण करत असलेल्या मोईसेस हेन्रीक्सने डाइव्ह मारत जबरदस्त झेल घेतला.

https://twitter.com/cricbuzz/status/1332998006963011584?s=19

स्मिथने झळकावले शतक

सलामीवीर डेविड वॉर्नर (83 धावा) आणि ऍरॉन फिंच (60 धावा) यांनी पहिल्या विकेटसाठी 142 धावांची भागीदारी केली. त्यानंतर स्टीव्ह स्मिथने आक्रमक खेळी करत 62 चेंडूत 104 धावा केल्या. स्मिथचे या मालिकेतील सलग दुसरे शतक होते.

लाबूशेन आणि मॅक्सवेलची फटकेबाजी

युवा फलंदाज मार्नस लाबूशेन (70 धावा) आणि अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल (63 धावा) यांनी अखेरच्या षटकांत केलेल्या फटकेबाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत 389 धावा केल्या.

महत्त्वाच्या बातम्या –

फिंच-वॉर्नर जोडीचा दणका ! भारताविरुद्ध शतकी भागीदारी करत केला अनोखा विक्रम

IND vs AUS ODI : भारताचा पुन्हा लाजीरवाणा पराभव, 51 धावांनी विजयासह ऑस्ट्रेलियाचा मालिकेवर ताबा

मोठी बातमी! पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमवर लैंगिक शोषणाचे आरोप; महिलेकडून पत्रकार परिषदेत धक्कादायक खुलासे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---