भारतीय क्रिकेटमध्ये आयपीएलची सुरुवात २००८ मध्ये झाली. त्यामुळे लीगच्या सुरूवातीपासूनच तरुण खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ मिळालं आहे. जिथे ते चांगले प्रदर्शन करून स्वत:ला सिद्ध करु शकतात आणि त्यामुळे त्यांना मोठ्या पातळीवर खेळण्याची सहज संधी मिळू शकते.
आयपीएलमध्ये “इमर्जिंग प्लेअर”(उदयोन्मुख खेळाडू) होण्यासाठी बरेच नियम आहेत. “त्यापैकी एक म्हणजे त्याचा जन्म १९९४ नंतर झाला असला पाहिजे. त्याने ४ पेक्षा कमी कसोटी सामने खेळले असावेत. त्याचबरोबर २० पेक्षा कमी आयपीएल सामनेही खेळले असावेत.”
आयपीएलमध्ये खेळणाऱ्या प्रत्येक युवा खेळाडूचं स्वप्न असतं, की त्याला इमर्जिंग प्लेअर हा पुरस्कार मिळावा.
आज आम्ही तुम्हाला त्या ४ खेळाडूंबद्दल सांगणार आहोत. जे आयपीएल २०२० झाले तर इमर्जिंग प्लेअरचा पुरस्कार मिळवू शकतात. ज्यांनी देशांतर्गत स्तरावर स्वतःला सिद्ध केलं आहे. ज्यामुळे त्यांच्या संघालाही त्यांच्याकडून बरीच अपेक्षा आहे.
हे ४ युवा खेळाडू जे जिंकू शकतात, “इमर्जिंग प्लेअर ऑफ आयपीएल २०२० चा पुरस्कार”
४. ऋतुराज गायकवाड –
चेन्नई सुपर किंग्जच्या संघात सहभागी झालेल्या ऋतुराज गायकवाडची(Ruturaj Gayakwad) कामगिरी पाहून त्याला यावेळी आयपीएलच्या या मोसमात नक्कीच खेळण्याची संधी मिळू शकते. यामुळे ऋतुराजला आयपीएल २०२० मध्ये “इमर्जिंग प्लेअर” बनण्याची संधी मिळेल.
ऋतुराजने टी२० प्रकारात आतापर्यंत २८ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने १३५.३१ च्या स्ट्राइक रेट आणि ३३.७२ च्या सरासरीने ८४३ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याने ६ अर्धशतकेही केली आहेत. दरम्यान, ऋतुराज सलामीवीर फलंदाज म्हणून पॉवरप्लेमध्ये आक्रमक खेळताना याआधी दिसला आहे.
ऋतुराजने भारत अ संघाकडून खेळतानाही दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे तेव्हापासून चेन्नई सुपर किंग्जच्या टीम मॅनेजमेंटचा त्याच्यावरचा विश्वास आणखी वाढला असेल. त्याच्याकडे सर्व परिस्थितीत खेळण्याची क्षमता आहे. ऋतुराज सध्या 22 वर्षांचा आहे.
३. विराट सिंग
सनरायझर्स हैदराबादच्या संघाने विराट सिंगला(Virat Singh) एक फिनिशर म्हणून संघात स्थान दिले आहे. झारखंडसाठी खेळताना होम ग्राऊंडवर शेवटच्या क्षणी त्याने ज्या प्रकारे फलंदाजी केली आहे, त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली की विराटला या मोसमात खेळण्याची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
विराट टी२० प्रकारात आतापर्यंत ५६ सामने खेळला आहे. ज्यामध्ये त्याने १२४.४५ च्या स्ट्राइक रेट सह ३५.२७ च्या सरासरीने १५५२ धावा केल्या आहेत. दरम्यान, त्याच्या १० अर्धशतकांचाही समावेश आहे. शेवटच्या षटकांमध्ये आक्रमक खेळण्याची क्षमता त्याच्यात आहे.
झारखंडचा हा युवा खेळाडू सध्या २२ वर्षांचा आहे. देवधर ट्रॉफीमध्ये त्याने ज्या प्रकारे फलंदाजी केली. त्या कारणास्तव, या संघाने त्याला लिलावात खरेदी केले होते. विराटमध्येही सर्व परिस्थितीत खेळण्याची क्षमता आहे. ज्यामुळे तो एक चांगला प्रतिभावान खेळाडू बनू शकतो.
२. कमलेश नागरकोटी
कमलेश नागरकोटी(Kamlesh Nagarkoti) या मोसमात कोलकाता नाईट रायडर्समध्ये खेळताना दिसणार आहे. मागील दोन हंगामात तो दुखापतीमुळे खेळू शकला नाही. पण या हंगामात कमलेश खेळताना दिसू शकतो.
कमलेश आतापर्यंत अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये ९ सामने खेळला आहे. ज्यामध्ये त्याने २६.२० च्या सरासरीने एका अर्धशतकासह १३१ धावा केल्या आहेत. त्यासह त्याने २५ च्या सरासरीने ११ बळीही घेतले आहेत. दरम्यान, ४.७६ इतका त्याचा इकॉनमी रेट राहिला आहे.
कमलेश सध्या 20 वर्षांचा आहे. त्याच्याकडे १४५ च्या वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. आणि त्याचबरोबर शेवटच्या क्षणीही तो उपयुक्त फलंदाजाची भूमिकाही बजावू शकतो. ज्यामुळे तो आयपीएल २०२० मधील महत्त्वाचा खेळाडू म्हणून सिद्ध होऊ शकतो.
१. देवदत्त पडीक्कल
हा खेळाडू मागील मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळत होता. पण विराट कोहलीने(Virat Kohli) त्याला अंतिम ११ मध्ये खेळण्याची संधी एकाही सामन्यात दिली नाही. त्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यावर देवदत्त पडीक्कलला(Devdutt Padikkal) आयपीएल २०२० मध्ये खेळण्याची संधी मिळू शकते.
देवदत्तने टी२० प्रकारात आतापर्यंत १२ सामने खेळले आहेत. त्याने ६४.४४ च्या अविश्वसनीय सरासरीने ५८० धावा केल्या आहेत. दरम्यान त्याचा १७५.७५ एवढा स्ट्राइक रेट होता. ज्यामध्ये त्याने ५ अर्धशतक आणि १ शतकही झळकावले आहे. देवदत्ताची टी२० मध्ये १२२ ही सर्वोत्तम धावसंख्या आहे.
देवदत्त सध्या १९ वर्षांचा आहे. यावेळी तो ज्या फॉर्ममध्ये आहे. त्याकडे पहिलं तर सहजपणे म्हणता येईल की संपूर्ण हंगामात या खेळाडूला खेळण्याची संधी मिळाली तर तो स्वत: ला सिद्ध करून क्रिकेटच्या मोठ्या स्तरावर प्रवेश करू शकतो.
वाचनीय लेख –
या ‘तीन’ कारणांमुळे रोहित शर्मा व्हावा भारतीय टी२० संघाचा कर्णधार
असे ‘३ विदेशी खेळाडू’ जे टीम इंडियाकडून खेळले तर आपण सहज जिंकू शकतो वर्ल्डकप
मॅन ऑफ द सिरीजमध्ये मिळालेली कार देखील क्रिकेट बोर्डाने त्याला लावली होती विकायला