कबड्डी मध्ये जितके महत्व रेडरला असते तितकेच महत्व डिफेंडरलाही असते. कधीकधी रेडर जास्त भाव खाऊन जातो पण त्याने डिफेंडरचे महत्वाचे कमी होत नाही. रेडरला प्रसिद्धी खूप मिळते पण डिफेंडर संघाची बाजू मजबूत ठेवण्याचे अत्यंत महत्वाचे काम करत असतात. त्यामुळे संघाच्या डिफेन्सच्या ताकदीवर एखादा सामना पूर्णपणे फिरून जातो हे आपण अनेकदा पाहिले असेल.
आता पाहू प्रो कबड्डीमधील टॉप १० डिफेंडर ज्यांनी मिळवले आहेत १०० पेक्षा अधिक गुण:
१ मंजीत चिल्लर -१९७(६० सामने)
२ मोहित चिल्लर -१७०(५८)
३ संदीप नरवाल-१६५(६३)
४ रविंदर पहल- १५५(४९)
५ धर्मराज चेरलाथन-१५५(६०)
६ सुरिंदर नाडा-१४३(५०)
७ निलेश शिंदे-१२१(५६)
८ जीवा कुमार-११३(५३)
९ गिरीश एर्नेक-१११(४९)
१० रण सिंग-१०५(५४)
या यादीत महाराष्ट्रातील दोन खेळाडू आहेत. एक म्हणजे निलेश शिंदे जो मागील चार मोसम बेंगाल वॉरियर्स संघाचा डिफेन्समधील मजबूत खेळाडू आणि कर्णधार होता. गिरीश एर्नेक हा ही महाराष्ट्राचा आणखी एक चेहरा जो मागील मोसमात यु मुंबा संघात खेळला होता, पण या मोसमात तो पुणेरी पलटण संघाकडून खेळतो आहे.
पुणेरी पलटण या महाराष्ट्रातील संघाकडे एकूण तीन खेळाडू असे आहेत की ज्यांनी डिफेन्समध्ये १०० पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. संदीप नरवालने १६५ तर धर्मराज चेरलाथनने १५५ गुण मिळवले आहेत आणि गिरीष एर्नेकने १११ गुण मिळवले आहेत.