वेस्ट इंडीज दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला सोमवारी (१ ऑगस्ट) टी-२० मालिकेतील दुसरा सामना खेळायचा आहे. उभय संघातील हा दुसरा सामना सेंट किट्स एंड नेविसच्या वॉर्नर पार्कवर खेळला जाईल. तत्पूर्वी पहिल्या टी-२० सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारताने यजमान संघाला ६८ धावांनी मात दिली होती. दुसऱ्या सामन्यापूर्वी सेंट्स किंट्समध्ये भारातचे राजदूत डॉ. केजे श्रीनिवास यांनी खेळाडूंनी दुतावासात आमंत्रित केले होते.
सेंट किट्स आणि नेविसच्या भारतीय दुतावासात राजदूत डॉ. केजे श्रीनिवास (Indian Diplomat. High Commissioner of India to Guyana,Antigua&Barbuda, St.Kitts&Nevis, CARICOM.) यांनी भारतीय संघाला आमंत्रित केल्याचे समजते. बीसीसीआयने या कार्यक्रमातील काही फोटो अधिकृत ट्वीटर खात्यावरून शेअर केले आहेत. खेळाडूंसाठी भारतीय दुतावासातील हा अनुभव खास असल्याचेही सांगितले जात आहे. बीसीसीआयने शेअर केलेल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “राजदूत डॉ. केजे श्रीनिवास यांनी आयोजित केलेल्या रिसेप्शनमध्ये भारतीय संघ.” या भेटीदरम्यान भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याला सन्मान चिन्हही दिले गेले.
📸📸
Snapshots from an official reception of #TeamIndia hosted by the High Commissioner, @drkjsrini in St. Kitts. pic.twitter.com/N2l0icfy6a
— BCCI (@BCCI) July 31, 2022
दरम्यान, भारतीय संघाच्या या वेस्ट इंडीज दौऱ्याचा विचार केला, तर संघाने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत जयमान संघाला क्लीन स्वीप (०-३) दिला होता. त्यानंतर उभय संघातील पाच सामन्यांची टी-२० मालिका सुरू झाली. टी-२० मालिकेतील पहिला सामना २९ जुलै रोजी खेळला गेला होता, जो भारताने ६८ धावांनी जिंकला. या विजयानंतर भारतीय संघ मालिकेत ०-१ अशा आघाडीवर आहे. अशात मालिकेतील दुसरा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात वेस्ट इंडीज संघ विजय मिळवून भारताशी बरोबरी साधण्याच्या प्रयत्नात असेल.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन –
रोहित शर्मा (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, रवी बिश्नोई.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
क्रिकेटमधील दुषित वातावरणाचे कारण देत विंडीजच्या आणखी एका दिग्गजाने जाहिर केली निवृत्ती!
हुश्श! भारतीय संघ आता सेमिफायनलमध्ये पोहचणार, फक्त करावे लागेल ‘हे’ सोपे काम
विंडीज संघाचा रडीचा डाव! सामना जिंकण्यासाठी बदलले ठिकाण? वाचा खरे कारण