नॉटिंगघम। इंग्लंड विरुद्ध भारत संघात ट्रेंटब्रिज मैदानावर सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताकडे ३३३ धावांची मोठी आघाडी आहे.
कालच्या २ बाद १२४ वरुन पुढे खेळायला सुरुवात करणाऱ्या भारताने आतापर्यंत ५१ षटकांत १६५ धावा केल्या आहेत.
आजपर्यंत इंग्लंड संघाने कधीही चौथ्या डावात ३३२ पेक्षा जास्त धावांचा यशस्वी पाठलाग केला नाही.
यापुर्वी २००४मध्ये ट्रेंट ब्रीजवर इंग्लंडने न्यूजीलंडविरुद्ध चौथ्या डावात ६ बाद २८४ धावा करत सामना जिंकला होता.
तर कसोटीत १९२८-२९मध्ये मेलबर्नला चौथ्या डावात आॅस्ट्रेलियाविरुद्ध ७ बाद ३३२ धावा करत सामना जिंकला होता.
तसेच कोणत्याही संघाने कसोटीत आजपर्यंत चौथ्या डावात ४१८ पेक्षा जास्त धावा करत सामना जिंकलेला नाही. विंडीजने २००२-०३मध्ये सेंटजोन्सला आॅस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या डावात ४१८ धावा करत सामना जिंकला होता.
सामन्याचे आजचा धरुन तीन दिवस बाकी आहेत. जर भारताने हे लक्ष ४००पेक्षा जास्त ठेवले तर इंग्लंडचे पराभूत होणे जवळपास पक्के आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–तिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स
–आॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती