चट्टोग्राम येथे पार पडलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने बांगलादेश संघाची दाणादाण उडवली. बांगलादेशच्या गोलंदाजांना चांगलाच चोप देत भारतीय फलंदाजांनी अशी काही धावसंख्या उभारली, जी पार करताना यजमानांच्या नाकी नऊ आल्या. यादरम्यान भारताच्या ईशान किशन आणि विराट कोहली या जोडीने भारतासाठी वनडेत तिसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च भागीदारी रचली.
भारतीय संघाने पहिले दोन वनडे सामने गमावले होते. या वनडेत भारताला विजय मिळवणे गरजेचे होते. हा विजय मिळवला नसता, तर बांगलादेशना भारताचा व्हाईटवॉश दिला असता. मात्र, ईशान किशन (Ishan Kishan) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्या जोडीने असे होण्यापासून रोखले. त्यांच्या 290 धावांच्या भागीदारीमुळे भारतीय संघाने निर्धारित 50 षटकात 8 विकेट्स गमावत बांगलादेशपुढे 409 धावा आव्हान उभे केले होते. हे आव्हान पार करण्यात बांगलादेश संघ अपयशी ठरला. त्यांचा डाव यावेळी 182 धावांवरच संपुष्टात आला. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात भारताने बांगलादेशवर 227 धावांनी विजय मिळवला.
ईशान आणि विराटची सर्वोच्च भागीदारी
प्रथम फलंदाजी करताना भारताकडून ईशान किशन आणि विराट कोहली यांनी 290 धावांची भागीदारी रचली होती. यामध्ये ईशानच्या 199 आणि विराटच्या 85 धावांचा समावेश होता. यासह ही भागीदारी भारतासाठी वनडे क्रिकेटमधील तिसरी सर्वोच्च भागीदारी ठरली. भारतासाठी वनडेत सर्वोच्च भागीदारी करणारी अव्वल जोडी म्हणजे सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) यांची होय. या जोडीने 1999मध्ये न्यूझीलंडविरुद्ध तब्बल 331 धावांची सर्वोच्च भागीदारी रचली होती. या यादीतील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च भागीदारी सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि राहुल द्रविड यांनी रचली होती. त्यांनी 1999मध्येच वनडेत श्रीलंकेविरुद्ध खेळताना तब्बल 318 धावांची भागीदारी रचली होती.
भारतासाठी वनडेत सर्वोच्च भागीदारी
331- सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड, विरुद्ध- न्यूझीलंड (1999)
318- सौरव गांगुली आणि राहुल द्रविड, विरुद्ध- श्रीलंका (1999)
290- ईशान किशन आणि विराट कोहली, विरुद्ध- बांगलादेश (2022)*
ईशान आणि विराटच्या वैयक्तिक धावा
या सामन्यात ईशान किशन याने 131 चेंडूत 210 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 10 षटकार आणि 24 चौकार मारले. त्याच्याव्यतिरिक्त विराट कोहली यानेही शतक साकारले. हे त्याचे 72वे आंतरराष्ट्रीय शतक होते. त्याने या सामन्यात 91 चेंडूत 131 धावा केल्या. यामध्ये 2 षटकार आणि 11 चौकारांचा समावेश होता. (Highest Partnership for India in ODI Ishan And Kohli Enters in list)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जे गेल अन् सेहवागलाही नाही जमलं, ते 24 वर्षांच्या किशनने करून दाखवलं; बातमी वाचाच
चार सामन्यात 4 वेगवेगळ्या सलामी जोड्या, भारतीय संघातील प्रयोगाला पूर्णविराम लागणार तरी कधी?