---Advertisement---

टी20 वर्ल्डकपमध्ये सूर्याचे कर्णधार म्हणून भन्नाट पदार्पण! बाबरचा विक्रम उध्वस्त, तर क्रिस गेल थोडक्यात…

On: रविवार, फेब्रुवारी 8, 2026 11:00 AM
---Advertisement---

भारत विरुद्ध यूएसए यांच्यात टी२० विश्वचषक २०२६चा तिसरा सामना खेळला गेला. शनिवारी (७ फेब्रुवारी) हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. ज्यामध्ये भारताच्या सूर्यकुमार यादवने नाबाद ताबडतोब अर्शशतकी खेळी करत अनेक विक्रमांना गवसणी घातली. त्याचे हे भारताकडून कर्णधार म्हणून टी२० विश्वचषकात पदार्पण होते. त्याने पहिलाच सामना गाजवत वेस्ट इंडिजच्या क्रिस गेलच्या विक्रमाला धक्का दिला आहे, तर पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझमला मागे टाकले आहे.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची सुरूवात धक्कादायक झाली. यूएसएच्या गोलंदाजीसमोर भारताची टॉप-ऑर्डर पूर्णपणे फेल झालेली दिसली. अभिषेक शर्मा तर शून्यवरच बाद झाला. त्यानंतर ईशान किशन २० धावा आणि तिलक वर्मा २५ धावा करत विकेट्स गमावून बसले. शिवम दुबेही शून्यावर बाद झाला, तर रिंकू सिंग आणि हार्दिक पांड्या एकेरी धावावर परतले.

हा सूर्यकुमारचा कर्णधार म्हणून पहिलाच टी२० विश्वचषक. त्याने जबाबदारी घेत टी२० वर्ल्ड कपमध्ये कर्णधार म्हणून पदार्पण करत सर्वोच्च धावसंख्या करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत प्रवेश केला आहे. त्याने यामध्ये ४९ चेंडूत नाबाद ८४ धावांची खेळी केली. ज्यामुळे तो या यादीत दुसऱ्या स्थानावर आला आहे.

पहिल्या स्थानी वेस्ट इंडिजचा क्रिस गेल आहे. त्याने २००९मध्ये टी२० विश्वचषकात कर्णधार म्हणून पदार्पण करताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८८ धावा केल्या होत्या.

सूर्यकुमारच्या या उल्लेखनीय खेळीमुळे बाबरचा विक्रम मागे पडला. बाबर या यादीत तिसऱ्या स्थानी आला आहे. त्याने २०२१मध्ये भारताविरुद्ध नाबाद ६८ धावा केल्या होत्या. चौथ्या स्थानी श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू महेला जयवर्धने आहे

टी२० वर्ल्ड कपमध्ये कर्णधार म्हणून पदार्पणात केलेली सर्वोच्च धावसंख्या

८८ -ख्रिस गेल विरुद्ध ऑस्ट्रेलिया, द ओव्हल 2009
८४* – सूर्यकुमार यादव विरुद्ध अमेरिका, वानखेडे 2026
६८* – बाबर आझम विरुद्ध भारत, दुबई २०२१
६५ – महेला जयवर्धने विरुद्ध केनिया, जोहान्सबर्ग 2007
६१ – मोहम्मद अशरफुल विरुद्ध वेस्ट इंडिज, जोहान्सबर्ग 2007

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---