वनडे क्रिकेटमध्ये आजकाल फलंदाजांचा स्ट्राईक रेट चांगला वाढला आहे. आजकाल फलंदाज पुर्वीपेक्षाही चांगल्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतात. त्याला गोलंदाजीच्या नियमात केलेले अनेक बदल कारणीभूत आहेत. तसेच इतरही अनेक गोष्टी जबाबदार आहे.
शेवटच्या १० षटकांत वनडेत आजकाल १२० धावा या अनेक संघ सहज करतात. परंतु या धावा सहज करण्यासाठी तसे अक्रमक फटके खेळणारे फलंदाजही संघात हवे असतात. याचमुळे मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये आक्रमक फलंदाजांचाच आजकाल भरणा जास्त दिसतो.
वनडे क्रिकेटमध्ये स्ट्राईक रेट याचा अर्थ १०० चेंडूमागे फलंदाज किती धावा काढतो. ज्या खेळाडूचा स्ट्राईक रेट जास्त तो जास्त आक्रमक म्हणून ओळखला जातो. २००८पासून काही असे फलंदाज आहेत ज्यांनी वनडेत शेवटच्या १० षटकांत फलंदाजी करताना १५०चा स्ट्राईक रेट राखला आहे. Highest Strike Rate in last 10 overs in ODIs since 2008.
शेवटच्या १० षटकांत वनडेत फलंदाजी करताना सर्वाधिक स्ट्राईक रेट असलेले फलंदाज (कमीतकमी ३०० चेंडू खेळलेले)
१७२.८६- एबी डिविलियर्स
१६७.७४- जाॅश बटलर
१६३.७९- ग्लेन मॅक्सवेल
१६३.०७- शाहिद आफ्रीदी
१५२.३३- रोहित शर्मा
१५१.६०- ऑयन माॅर्गन
१४९.४८- कुमार संगकारा
१४७.८७- विराट कोहली
१४६.८३- फाफ डुप्लेसी
१४४.६३- ल्युक रांची