पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात ३ सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर झालेला दुसरा सामना अतिशय रोमांचक राहिला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ३०० पेक्षा जास्त धावा फलकावर लावल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि इमाम-उल-हक यांच्या शानदार शतकांच्या जोरावर संघाने आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला आणि ६ विकेट्स राखून सामना जिंकला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने निर्धारित ५० षटकांमध्ये ८ विकेट्सच्या नुकसानावर ३४८ धावा केल्या. बेन मॅकडरमटचे शतक आणि ट्रॅविस हेडच्या झुंजार खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ही भलीमोठी धावसंख्या उभारली होती. मॅकडरमटने ४ षटकार आणि १० चौकारांच्या मदतीने १०४ धावा केल्या होत्या. तर हेडने सलामीला फलंदाजीला येत ८९ धावांची शानदार खेळी केली होती.
पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाचे (PAK vs AUS) ३४९ धावांचे आव्हान पार करणे अशक्य दिसत होते. परंतु पाकिस्तानच्या आघाडीच्या ३ फलंदाजांनी संघाला दमदार सुरुवात करून देत सामना आपल्या बाजूने फिरवला. फखर जमान आणि इमाम-उल-हक (Imam-Ul-Haq) यांनी सलामीला फलंदाजीला येत पहिल्या विकेटसाठी ११८ धावांची भागीदारी केली. फखर जमान वैयक्तिक ६७ धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) मैदानावर सेट झालेल्या इमाम-उल-हकला साथीला घेत डाव पुढे नेला.
इमा-उल-हकने वैयक्तिक १०६ धावा केल्या. ९७ चेंडूंमध्ये ३ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने त्याने या धावा फटकावल्या. तर आझम ८३ चेंडू खेळताना १ षटकार आणि ११ चौकारांच्या मदतीने ११४ धावा केल्या. त्यांच्या या शानदार खेळींच्या (Centuries Of Azam & Imam) जोरावर पाकिस्तानने ४९ षटकांमध्येच ऑस्ट्रेलियाचे आव्हान पूर्ण केले आणि ६ विकेट्स राखून सामना खिशात घातला.
A stunning win for Pakistan.
Centuries for Imam-ul-Haq and Babar Azam help them chase down 348 with an over to spare.
Watch #PAKvAUS live on https://t.co/CPDKNxoJ9v (in select regions) 📺 | 📝:https://t.co/x6oj01SOzk pic.twitter.com/QcLGdE0boZ
— ICC (@ICC) March 31, 2022
हा पाकिस्तानने वनडे क्रिकेटमध्ये मोठ्या आव्हानाचा केलेला दुसरा यशस्वी (Highest Successful Chase By Pakistan In ODI) पाठलाग आहे. यापूर्वी २०१४ मध्ये ढाका येथे बांगलादेशविरुद्ध झालेल्या वनडे सामन्यातही पाकिस्तानने ३२९ धावांचा पाठलाग करताना ३ विकेट्सने सामना जिंकला होता. याखेरीज पाकिस्तानने पाकिस्तानात डोंगराएवढ्या (Highest Successful Chase By Pakistan In Pakistan) आव्हानाचा पाठलाग करताना केलेलाही हा दुसरा यशस्वी पाठलाग आहे. यापूर्वीही पाकिस्तानने लाहोरच्याच मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३१६ धावांच्या यशस्वी पाठलाग केला होता. हा सामना १९९८ मध्ये झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
गंभीरचं धोनीसोबतचं नातं आहे ‘खंबीर’! लखनऊच्या मेंटॉरने चेन्नईच्या माजी कर्णधाराची घेतली भेट, Photo
आयपीएलला मिस करतोय सॅम करन; म्हणाला, ‘मला आयपीएलमध्ये सहभागी व्हायचे होते, पण…’