गतविजेता गुजरात टायटन्स संघाने आयपीएल 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाविरुद्ध जबरदस्त आव्हान उभे केले आहे. हे आव्हान उभे करण्यासोबतच त्यांनी खास विक्रमही नावावर केला आहे. विशेष म्हणजे, आयपीएल प्ले-ऑफ्समध्ये सर्वोच्च धावा करणाऱ्या संघांच्या यादीत गुजरातनेच टॉप केला आहे. चला तर याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
झाले असे की, सोमवारी (दि. 29 मे) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगलेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाचा कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 4 विकेट्स गमावत 214 धावा केल्या. या धावा करण्यासोबतच गुजरातने खास विक्रम नावावर केला.
गुजरात टायटन्सचा विक्रम
गुजरातने 214 धावा करत आयपीएल प्ले-ऑफ्समध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या संघांच्या यादीत चौथे स्थान पटकावले. प्ले-ऑफ्समध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या संघांच्या यादीत अव्वलस्थानी गुजरातच आहे. त्यांनी आयपीएल 2023 (IPL 2023) हंगामातील क्वालिफायर 2 सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध 3 विकेट्स गमावत 233 धावांचा डोंगर उभारला होता. यानंतर यादीत दुसऱ्या स्थानी पंजाब किंग्स संघ असून त्यांनी आयपीएल 2014मधील क्वालिफायर 2 सामन्यात मुंबई येथे चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध खेळताना 6 विकेट्स गमावत 226 धावा केल्या होत्या.
यानंतर यादीत तिसऱ्या स्थानी चेन्नई संघ असून त्यांनी आयपीएल 2012च्या हंगामातील क्वालिफायर 2 सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 5 विकेट्स गमावत 222 धावांचा डोंगर उभारला होता. यादीत पाचव्या स्थानी सनरायझर्स हैदराबाद संघ असून त्यांनी आयपीएल 2016च्या अंतिम सामन्यात बंगळुरू येथे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध 7 विकेट्स गमावत 208 धावांचा डोंगर उभारला होता. (Highest team totals in IPL playoffs gujarat titans record)
आयपीएल प्ले-ऑफ्समध्ये सर्वाधिक धावसंख्या उभारणारे संघ
233/3 – गुजरात वि. मुंबई , अहमदाबाद, 2023 (क्वालिफायर 2)
226/6 – पंजाब विरुद्ध चेन्नई, मुंबई, 2014 (क्वालिफायर 2)
222/5 – चेन्नई वि. दिल्ली, चेन्नई 2012 (क्वालिफायर 2)
214/4 – गुजरात वि. चेन्नई, अहमदाबाद, (अंतिम सामना)*
208/7 – हैदराबाद वि. बेंगलोर, बंगळुरू, 2016 (अंतिम सामना)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फायनलमध्ये साईने दिले ‘सुदर्शन’! चेन्नईची गोलंदाजी फोडत ठोकल्या वादळी 96 धावा
वय झालं तरी चित्त्याची चपळाई कमी होत नसते! गिलला यष्टीचित करणाऱ्या धोनीवर कौतुकाचा वर्षाव, बघा तो Video