भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात खेळविण्यात येत असलेल्या वनडे मालिकेत अनेक विक्रम रचले जात आहेत. या मालिकेतील पहिल्या सामन्यांत ऑस्ट्रेलियन संघाने ३७४/६ अशी धावसंख्या उभारत भारताविरुद्ध एकदिवसीय सामन्यांत कुठल्याही संघाने उभारलेली तिसर्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. मात्र ह्याला दोन दिवस उलटत नाही तोच ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी हा देखील विक्रम मोडला.
सिडनी क्रिकेट मैदानावर रविवारी (२९ नोव्हेंबर) खेळविण्यात आलेल्या दुसर्या वनडे सामन्यांत ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी ३८९ धावा उभारत भारताविरुद्ध एकदिवसीय सामन्यांतील तिसर्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या पुन्हा एकदा आपल्या नावे केली. ह्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेने २०१५ साली मुंबईत रचलेली ४३८/५ ही धावसंख्या भारताविरुद्ध कोणत्याही संघाने वनडे सामन्यांत उभारलेली सर्वोच्च धावसंख्या आहे. श्रीलंकन संघाने २००९ साली राजकोट येथील सामन्यांत केलेली ४११/८ धावसंख्या, या यादीत दुसर्या क्रमांकावर आहे.
वनडे सामन्यांतील भारताविरुद्धच्या सर्वाधिक धावसंख्या
१) ४३८/४ दक्षिण आफ्रिका (मुंबई, २०१५)
२) ४११/८ श्रीलंका (राजकोट, २००९)
३) ३८९/४ ऑस्ट्रेलिया (सिडनी, २०२०)
४) ३७४/६ ऑस्ट्रेलिया (सिडनी, २०२०)
ऑस्ट्रेलियाचे भारताला ३९० धावांचे आव्हान
सिडनी क्रिकेट मैदानावर झालेल्या भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या दुसर्या वनडे सामन्यात स्टीव स्मिथच्या शतकी खेळीच्या जोरावर पहिल्या डावात ३८९/४ अशी धावसंख्या उभारली. ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या तडाख्यासमोर भारतीय गोलंदाजांची पुरती वाताहात झाली.
प्रतिउत्तरादाखल भारतीय फलंदाजांना ३९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ९ बाद ३३८ धावाच करता आल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने ५१ धावांनी विजय मिळवत ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत २-० अशी आघाडी मिळवली.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय वनडे संघाला लवकरच ‘हे’ तीन दिग्गज ठोकू शकतात राम – राम
“ही तर आयपीएल कराराची परतफेड”, ऑस्ट्रेलियन खेळाडूने सोडलेल्या कॅचवर माजी क्रिकेटपटूची प्रतिक्रिया
अफलातून ! हेन्रीक्सने विराटचा घेतला जबरदस्त झेल, पाहा व्हिडिओ