माऊंट मॉनगनुई| भारताचा न्यूझीलंड विरुद्ध तिसरा वन-डे सामना बे ओव्हल मैदानावर आज (28 जानेवारी) पार पडला असून भारताने हा सामना 7 विकेट्सने जिंकला आहे. तसेच 5 सामन्यांच्या वनडे मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
न्यूझीलंडमध्ये भारत प्रथमच विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली वन-डे मालिका खेळत आहे. या विजयाने त्याने सर्वोच्च वन-डे विजयाची टक्केवारी असणाऱ्या कर्णधारांमध्ये (कमीत कमी 25 सामने) दुसरा क्रमांक गाठला आहे.
यावेळी त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटींग आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार हॅंसी क्रोनिए या दोघांना मागे टाकले आहे.
विराटने आतापर्यंत 63 वन-डे सामन्यात संघाचे नेतृत्व केले आहे. यातील 47 सामन्यात भारताने विजय मिळवला असल्याने त्याची कर्णधार म्हणून सामना विजयाची टक्केवारी 74.60 अशी झाली आहे.
विंडीजचे महान क्रिकेटपटू क्लाईव्ह लॉइड यांनी 84 वन-डे सामन्यात संघाचे नेतृत्व केले असून त्यातील 64 सामन्यात संघाला विजय मिळवून दिला आहे. त्यांची विजयाची टक्केवारी 76.19 एवढी असून ते अव्वल क्रमांकावर आहे.
पॉंटींग आणि क्रोनिए यांची विजयाची टक्केवारी सारखीच आहे. पॉंटींग कर्णधार असताना ऑस्ट्रेलियाने 230 पैकी 165 सामन्यात विजय मिळवला आहे. तर क्रोनिए कर्णधार असताना दक्षिण आफ्रिकेने 138 पैकी 99 वन-डे सामन्यात विजय मिळवला आहे.
सर्वोच्च वन-डे विजयाची टक्केवारी असणारे कर्णधार (कमीत कमी 25 सामने)-
76.19 क्लाईव्ह लॉइड (विंडीज- 64/84)
74.60 विराट कोहली (भारत- 47/63)
71.74 हॅंसी क्रोनिए (दक्षिण आफ्रिका- 99/138)
71.74 रिकी पॉंटींग (ऑस्ट्रेलिया- 165/230)
महत्त्वाच्या बातम्या-
–भारताच्या ‘कुल-चा’ जोडीने विकेट्सची सेंचूरी केली पूर्ण
–अंबाती रायडूला मोठा धक्का, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करू शकणार नाही गोलंदाजी
–हिटमॅन रोहित शर्माने केली एमएस धोनीच्या विक्रमाची बरोबरी