अमेरिका क्रिकेट संघ पहिल्यांदाच द्विपक्षीय मालिकेत आयर्लंड संघाविरुद्ध दोन हात करत आहे. या दोन्ही संघांमध्ये २ टी२० आणि ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडणार आहे.टी २० मालिकेतील पहिला सामना बुधवारी (२२ डिसेंबर) पार पडला. या सामन्यात अमेरिका संघाने आयर्लंड संघाला धूळ चारत २६ धावांनी विजय मिळवला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अमेरिका हा नवखा संघ आहे. ज्यामध्ये इतर देशातील खेळाडू खेळताना दिसून येत आहेत. दरम्यान पहिल्याच सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवत अमेरिका संघाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. (Ireland vs America t20 series)
अमेरिका संघाने या सामन्यात ज्याप्रकारे सुरुवात केली होती, त्यावरून वाटले ही नव्हते की, अमेरिका संघ मोठी धावसंख्या उभारणार. परंतु या संघातील ३ फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी केली आणि अमेरिका संघाला मजबूत स्थितीत पोहचवले. या सामन्यातील दुसऱ्याच चेंडूवर कर्णधार मोनांक पटेल २ धावा करत माघारी परतला होता. त्यानंतर तिसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर जेवियल मार्शल देखील ४ धावा करत माघारी परतला. तसेच रित्विक बेहरे आणि रयान स्कॉट देखील बाद होऊन माघारी परतले. अमेरिका संघाचे अवघ्या १६ धावांवर ४ गडी माघारी परतले होते.
या ३ फलंदाजांनी आणले वादळ
अमेरिका संघ अडचणीत असताना, भारतात जन्मलेल्या खेळाडूने अमेरिकेचा डाव सावरला. महाराष्ट्राच्या भूमीत जन्मलेल्या सुशांत मोदानीने गयानामध्ये जन्मलेल्या गजानंद सिंगसोबत महत्वाची भागीदारी केली. दोघांनी मिळून ५ व्या गड्यासाठी १२६ धावांची भागीदारी केली. ज्यामध्ये गजानंद सिंगने सर्वाधिक ६५ धावांची खेळी केली.
त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मार्टिन केनने मैदानावर वादळ आणले होते. त्याने अवघ्या १५ चेंडूंमध्ये ३ चौकार आणि ३ षटकारांच्या साहाय्याने ३९ धावांची तुफानी खेळी केली. या खेळीच्या जोरावर अमेरिका संघाला २० षटक अक्षर १८८ धावांचा डोंगर उभारण्यात यश आले होते.
हे वाचा : क्रिकेट कारकिर्द धोक्यात असताना अश्विनसाठी देवासारखा धावून आलेला धोनी! दिलेला ‘कामाचा सल्ला’
आयर्लंड संघातील फलंदाजांनी टेकले गुडघे
आयर्लंड संघाला हा सामना जिंकण्यासाठी १८९ धावांची आवश्यकता होती. या धावांचा पाठलाग करताना, लॉर्कन टकरने सर्वाधिक ५७ धावांची खेळी केली. तर सलामीवीर फलंदाज पॉल स्टर्लिंगने ३१ धावांचे योगदान दिले. तर इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. ज्यामुळे आयर्लंड संघाला २० षटक अखेर अवघ्या ६ बाद १६२ धावा करता आल्या. हा सामना २६ धावांनी आपल्या नावावर करत, अमेरिकेने ऐतिहासिक विजय मिळवला.
महत्वाच्या बातम्या :
‘कितने आदमी थे’ डायलॉगवर शिखर धवनची कडक ऍक्टिंग, सिनेमातील ‘गब्बर’लाही देईल टक्कर!
Video: लाईव्ह सामन्यातील ‘ब्रोमान्स’ची इंटरनेटवर तुफान चर्चा, कर्णधाराचे मैदानातच गोलंदाजाला किस
हे नक्की पाहा :