भारतीय हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या (Asian Champions Trophy) रोमांचक सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ४-३ असा पराभव केला. या सामन्यातील विजयासह भारतीय संघाने केवळ कांस्यपदकावरच (Hockey India Won Bronze) कब्जा करत, या स्पर्धेत तिसरे स्थान पटकावले. त्याचवेळी पाक संघ चौथ्या क्रमांकावर राहिला. (INDvPAK)
असा रंगला सामना
सामन्याच्या पहिल्या हाफपासूनच दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला भारतीय संघाने शानदार खेळ दाखवत पहिला गोल केला. हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरवर हा गोल करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली.
पाकिस्ताननेही हार न मानता अप्रतिम पुनरागमन करत १-१ अशी बरोबरी साधली. हा गोल अफराझने काउंटर अटॅकवर केला. उत्तरार्धात दोन्ही संघांनी पूर्ण प्रयत्न केले. मात्र, या क्वार्टरमध्ये एकही गोल होऊ शकला नाही.
सामन्याच्या तिसऱ्या हाफमध्ये पाकिस्तानने वेगाने आक्रमण केले. अब्दुल राणाने पाकिस्तानसाठी दुसरा गोल अगदी सहज करत संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. तिसरा क्वार्टर संपण्यापूर्वी भारताने सामन्यात जबरदस्त पुनरागमन केले, वेळ संपण्यापूर्वी सुमितने गोल करत भारताला सामन्यात पुनरागमन करून दिले. यावेळी सामना ३-३ अशा बरोबरीत होता.
सामन्याच्या शेवटच्या हाफमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानला हालचाल करु दिली नाही. सामना संपण्याच्या काही वेळापूर्वी भारताने तिसरा गोल केला. वरुण कुमारने पेनल्टी कॉर्नरचा फायदा घेत हा गोल केला. अक्षयदीप सिंगने भारतासाठी चौथा गोल करत भारताचा विजय निश्चित केला.
हरमनप्रीतची शानदार कामगिरी
भारतीय संघाचा युवा खेळाडू व उपकर्णधार हरमनप्रीत सिंग (Harmanpreet Singh) याने संपूर्ण स्पर्धेत शानदार खेळ दाखवला. त्याने ६ सामन्यात एकूण आठ गोल केले. दिलप्रीत सिंगनेही ५ गोल केले. त्याचवेळी अक्षयदीप सिंग आणि ललित उपाध्याय यांनी प्रत्येकी दोन गोल केले. स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत मंगळवारी दक्षिण कोरियाने अत्यंत रोमांचक सामन्यात पाकिस्तानचा ६-५ असा पराभव केला होता. तर, भारताला जपानविरुद्ध ५-३ असा पराभव पत्करावा लागलेला.
महत्त्वाच्या बातम्या-
काय सांगता? विश्वविक्रमवीर एजाजची न्यूझीलंड संघातून गच्छंती; प्रशिक्षक म्हणतायेत…
सर्व काही जुळून आले तर ‘या’ दिवशी पार पडेल आयपीएल २०२२ मेगा लिलाव!
माजी निवडसमिती अध्यक्षांचे भारताच्या प्लेइंग इलेव्हनविषयी मोठे विधान; संभाव्य नावेही सांगितली