आज बांगलादेशने ऑस्टेलिया संघावर ऐतिहासिक विजय मिळवला. आजपर्यंतच्या क्रिकेटच्या इतिहासात बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला कधीही पराभूत केले नव्हते. आज बांग्लादेशच्या पंतप्रधान यांच्या उपस्थितीत बांगलादेशने या विजयावर शिक्कामोर्तब केले.
याबरोबर आशिया खंडातील या देशाने भारत श्रीलंका आणि पाकिस्तान या संघांनी परदेशी संघाबरोबर केलेले अनेक विक्रम अबाधित ठेवले. असेच काही विक्रम ज्यांची दखल क्रिकेटप्रेमींनी नक्की घ्यायला हवी.
#१ ऑस्ट्रेलियाचा ऑक्टोबर २००८ नंतर आशिया खंडातील हा १६ वा पराभव आहे. २३ कसोटी सामन्यात भारताविरुद्ध १०, श्रीलंकेविरुद्ध ३, पाकिस्तान विरुद्ध २ आणि बांगलादेश विरुद्ध १ असे हे पराभव आहे.
#२ गेल्या १४ कसोटी सामन्यात आशिया खंडात ऑस्टेलियाला फक्त १ विजय मिळवता आला आहे. तोही पुण्यातील गहुंजेच्या मैदानावर.
#३ बांगलादेश संघाने घराच्या मैदानावर झालेल्या शेवटच्या दोन्ही कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे. नोव्हेंबर २०१६ मध्ये इंग्लंड तर ऑगस्ट २०१७ मध्ये ऑस्टेलिया संघावर हे विजय मिळवले आहे.
#४ ऑस्ट्रेलिया संघाचा पहिला कसोटी पराभव करण्यासाठी बांगलादेश संघाला फक्त ५वा कसोटी सामना लागला. यापूर्वी केवळ पाकिस्तान(१), इंग्लंड(२) आणि विंडीज(५) यांनी अशी कामगिरी केली आहे.
#५ सामनावीर शाकिब उल हसन या रिचर्ड हॅडली यांच्यानंतर केवळ दुसरा खेळाडू बनला आहे ज्याने तीन वेळा कसोटी सामन्यात अर्धशतक आणि १० विकेट्स घेतल्या आहेत.
#६ ऑस्ट्रेलियामध्ये २०१५ साली झालेल्या विश्वचषकानंतर बांगलादेश संघाने इंग्लंड, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया संघाला कसोटीमध्ये तर इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्युझीलँड, भारत, पाकिस्तान, श्रीलंका, झिम्बाब्वे, अफगाणिस्तान आणि आयर्लंड संघाला वनडे सामन्यात पराभूत केले आहे.
#७ कसोटी सामन्यातील बांगलादेशचा हा १० वा विजय आहे. त्यात झिम्बाब्वे विरुद्ध ५, विंडीज विरुद्ध २ आणि श्रीलंका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध १ विजय या संघाने मिळवला आहे.
#८ गेल्या १० वर्षात ऑस्ट्रेलिया संघाला आशिया खंडात २३ सामन्यात २ विजय मिळवता आले आहे तर गेल्या १० वर्षात आशियायी संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध ऑस्ट्रेलियात १ विजय मिळवला आहे.
PC: espncricinfo.com