पुणे, 5 जुलै: हॉकी पुणे लीग 2024-25 च्या वरिष्ठ विभागीय सामन्यात क्रीडा प्रबोधिनी ’अ’ संघाने विजयाने सुरुवात केली तर सेंट्रल रेल्वेने सलग दुसर्या विजयाची नोंद केली.
नेहरूनगर-पिंपरी येथील मेजर ध्यानचंद स्टेडियमवर शुक्रवारी राहुल शिंदे (25वे) आणि धैर्यशील जाधव यांच्या (40वे) प्रत्येकी एका गोलच्या जोरावर क्रीडा प्रबोधिनीने इन्कम टॅक्स, पुणे संघावर 2-0 अशी मात केली. लीगमधील तिसरा सामना खेळणार्या इन्कम टॅक्सचा हा दुसरा पराभव आहे. अवघ्या एका गुणासह ते पाचव्या स्थानावर आहेत.
संध्याकाळी उशिरा झालेल्या रोमांचक सामन्यात, सेंट्रल रेल्वे, पुणेने पीसीएमसी अकॅडमी ‘अ’चा 6-4 असा पराभव केला. मयूर नलावडे (4थे -पीसी, 52वे) आणि स्टीफन स्वामीचे (5वे पीसी, 59वे) प्रत्येकी दोन तसेच प्रज्वल मोरकर (6वे पीसी) आणि आदित्य रसाला (40वे) यांच्या प्रत्येकी एका गोलमुळे सेंट्रल रेल्वेने मोठा विजय साकारला. सुरुवातीच्या तीन मिनिटांनंतर 0-3 अशा पिछाडीवर असलेल्या पीसीएमसी अकॅडमीने अभिषेक माने (28वे), संजीव चौहान (32वे-पीसी) आणि नंतर अर्जुन हरगुडे (53वे, 58वे) यांच्यामुळे सामन्यात थोडी रंगत आली.
सेंट्रल रेल्वेने सलग दुसरा सामना जिंकून त्यांची एकूण गुणसंख्या 6 वर नेली. सेंट्रल रेल्वेकडून तिसरा पराभव पत्करलेल्या पीसीएमसी अकॅडमीला चार सामन्यांत तिसरा पराभव पत्करावा लागल्यानंतर त्यांच्या खात्यात केवळ 1 गुण जमा आहे.
कनिष्ठ विभागीय लीगमध्ये, क्रीडा प्रबोधनी ’ब’ संघाने ब गटात रोव्हर्स हॉकी अकॅडमीला 8-2 अशा फरकाने पराभूत केले. कार्तिक पाठारे (2रा पीसी., 5वे, 19वे-पीसी) हा विजयाचा शिल्पकार ठरला. सूरज शुक्ला (29वे), अत्रव वाघमारे (38वे -पीसी), राजरत्न कांबळे (44वे, 60वे) आणि विश्वनाथ अजिंक्यची (52वे) त्याला चांगली साथ लाभली. रोव्हर्स हॉकी अकॅडमीकडून दोन्ही गोल तुषार दुर्गाने (49व्या-पीसी, 55व्या-पीसी) केले.
निकाल –
कनिष्ठ विभाग
ब गट: क्रीडा प्रबोधनी ’ब’: 8(कार्तिक पाठारे 2रा-पीसी. 5वा, 19वा-पीसी; सूरज शुक्ला 29वा; अत्रव वाघमारे 38वा-पीसी; राजरत्न कांबळे 44वा, 60वा; विश्वनाथ अजिंक्य 52वा-पीसी) विजयी वि. रोव्हर्स हॉकी अकॅडमी:2(तुषा दुर्गा 49वा-पीसी, 55वा-पीसी). हाफटाईम: 2-2
वरिष्ठ विभाग
क्रीडा प्रबोधिनी ’अ’: 2(राहुल शिंदे 25 वा; धैर्यशील जाधव 40 वा) विजयी वि. इन्कम टॅक्स, पुणे: 0. हाफटाईम: 1-0
सेंट्रल रेल्वे, पुणे: 6(मयूर नलावडे 4थे-पीसी, 52वे; स्टीफन स्वामी 5वे-पीसी, 59वे; प्रज्वल मोरकर 6वे-पीसी; आदित्य रसाला 40वे) विजयी वि. पीसीएमसी अकॅडमी ’अ’: 4(अभिषेक माने 28वे; संजीव चौहान 32वे-पीसी; अर्जुन हरगुडे 53वा, 58वा). हाफटाईम: 3-1