भुवनेश्वर। कलिंगा स्टेडियमवर सुरू असलेल्या 14व्या हॉकी विश्वचषकात आज (8 डिसेंबर) क गटाचे साखळी फेरीचे शेवटचे सामने होणार आहेत. यातील पहिला सामना बेल्जियम विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा होणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 5 वाजता सुरूवात होणार आहे.
या विश्वचषकात बेल्जियमने पहिला सामना जिंकत चांगली सुरूवात केली. यामध्ये त्यांनी कॅनडाला 2-1 असे पराभूत केले होते. पहिल्या विजयामुळे आनंदी झालेल्या बेल्जियमला मात्र भारताविरुद्ध 2-2 असे समाधान मानावे लागले.
दुसरीकडे दक्षिण आफ्रिेकेची पहिल्या विजयाची प्रतिक्षा कायम आहे. त्यांना पहिल्याच सामन्यात यजमान भारताकडून 0-5 असा मोठा पराभव स्विकारावा लागला. तर दुसऱ्या सामन्यात कॅनडा विरुद्ध 1-1 असे बरोबरी साधावी लागली.
हे दोन संघ विश्वचषकात आज चौथ्यांदा आमने-सामने येत असून यातील दोन सामन्यात विजय मिळवत दक्षिण आफ्रिका आघाडीवर आहे. तर एक सामना अनिर्णीत राहिला. तसेच 2013पासून या संघामध्ये चार सामने झाले आहेत. हे चारही सामने बेल्जियमने जिंकले आहेत. यामध्ये त्यांनी एकूण 22 गोल केले होते.
बेल्जियमला मागील दोन्ही सामन्यात विरोधी संघाचा चांगलाच प्रतिकार करावा लागला आहे. तसेच त्यांचा गोलकिपर वॅनस्च विन्सेंटने या सामन्यांमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. त्यांच्याकडून हेंड्रीक्स अलेक्झांडर, गॉगनार्ड सिमॉन, ब्रिल्स थॉमस आणि डेनायर फेलीक्स यांना गोल करण्यात यश आले आहे.
तसेच दक्षिण आफ्रिकेने पहिल्या सामन्यातील पराभव विसरत कॅनडा विरुद्ध कामगिरी उंचावली होती. हा फॉर्म कायम ठेवत ते आजच्या सामन्यात विजय मिळवण्याचा प्रयत्न करणार आहेत.
दोन्ही संघासाठी हा विजय महत्त्वाचा आहे. बेल्जियमला हा सामना जिंकत उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित करायचे आहे. तर दक्षिण आफ्रिकेला या स्पर्धेत आव्हान कायम ठेवायचे आहे.
आज होणाऱ्या बेल्जियम विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट नेटवर्क, दूरदर्शनवर आणि एफआयएचच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर होणार आहे.
असे आहेत संघ:
दक्षिण आफ्रिका- ड्रुमॉँड टीम (कर्णधार), स्मिथ ऑस्टीन, ड्लुंग्वाना टायसन, विंबी ओवेन, लेमबेथ डुडुज्हो, हाइक्स जुलियन, हॅमॉंड थॉमस, होर्ने किनन, कॅसिम दयान, हॅलकेट ऱ्हेट, पॉट्झ रिचर्ड, जुलीयस रायन, डार्ट टायलर, पॅटॉन ट्रनी, मिआ मोहम्मद, लोव लान्स, युस्टस जेथ्रो, बेल डॅनियल, पिटर्स रस्सी (गोलकीपर), स्पॅनर निकोलस, टूली कोबीले, जोन्स गोवान (गोलकीपर)
बेल्जियम: ब्रिल्स थॉमस (कर्णधार), वॅन डोरेन आर्थर, डोहमेन जॉन-जॉन, वॅन युबेल फ्लोरेंट, बोकार्ड गॉथियर, स्टॉकब्रोक्स इम्मानुअल, डेनायर फेलीक्स, वॅनस्च विन्सेंट (गोलकीपर), लुपार्ट लॉइक, वेगनेझ विक्टर, बून टॉम, हेंड्रीक्स अलेक्झांडर, गॉगनार्ड सिमॉन, डोकियर सेबास्टीन, चार्लीयर सेड्रीक, डे कॅरपेल निकोलस, डे स्लूवर आर्थर
महत्त्वाच्या बातम्या:
–हॉकी विश्वचषक २०१८: इंग्लंड विरुद्धच्या पराभवाने आयर्लंड स्पर्धेतून बाहेर
–विराट कोहलीची कसोटीमध्ये या गोलंदाजाने केली आहे सर्वाधिक वेळा शिकार
–भारताच्या या बॅडमिंटनपटूचे मतदार यादीतून नाव झाले गायब