भारतामध्ये बुधवारपासून (28 नोव्हेंबर) 14 व्या हॉकी विश्वचषकाला सुरुवात झाली आहे. मात्र ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी भारतात येऊ इच्छिणाऱ्या पाकिस्तानच्या पत्रकारांचा मात्र व्हिसा नाकारण्यात आला आहे.
इस्लामाबादमधील भारतीय दूतावासाबरोबर अनेक विचारविनिमयांनंतर पाकिस्तानच्या हॉकी संघाला व्हिसा मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर एक आठवड्याने ही गोष्ट घडली आहे.
याबदद्ल पाकिस्तान हॉकी फेडरेशनचे सरचिटणीस शाहबाज अहमद म्हणाले, ‘सात पत्रकारांनी व्हिसासाठी अर्ज केला होता. पण त्यांच्यातील एकाचाही व्हिसा मंजूर झालेला नाही.’
त्याचबरोबर नाव न सांगण्याच्या अटीवरुन पाकिस्तान हॉकी फोडरेशनचे एक अधिकारी म्हणाले, ‘पत्रकारांना व्हिसा का नाकारण्यात आला? ते आपल्यात असलेले अंतर कमी करण्यासाठीचा दूवा आहेत. त्यांना फक्त विश्वचषक स्पर्धा कव्हर करायची होती. कारण हॉकीमध्ये भारत आणि पाकिस्तान मोठे संघ आहेत. पत्रकारांना भारतात यायचे होते कारण संस्कृती, भाषा, इ. सारखे आहे आणि त्यांना त्याचा अनुभव घ्यायचा होता.’
याबरोबरच युवा क्रिडापत्रकार प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची इच्छा असणाऱ्या कराची आणि पेशावरमधील पाकिस्तानचे दोन युवा क्रिडा पत्रकारांना व्हिसा नाकारण्यात आले आहे. त्यांनी एक महिन्यापूर्वी व्हिसासाठी अर्ज केला होता.
भारतीय क्रीडा पत्रकार संघाने (एसजेएफआय) इंटरनॅशनल स्पोर्ट्स प्रेस असोसिएशन (एआयपीएस एशिया) च्या मान्यतेसह अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका आणि मलेशियातून युवा पत्रकारांना विश्वचषक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले होते.
याबद्दल एसजेएफआयच्या इंटरनॅशनल अॅफेएरचे (आंतरराष्ट्रीय घडामोडी) अध्यक्ष आणि एआयपीएस उपाध्यक्ष एस सबा नयाकन म्हणाले, ‘ फक्त पाकिस्तानचे अर्ज नाकारण्यात आले आहेत. त्यांना व्हिसा का मंजूर झाला नाही हे समजले नाही.’
तसेच एआयपीएस एशियाचे सरचिटणीस अमजाद आझीज मलिक यांचाही व्हिसा नाकारण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–पृथ्वी शाॅचा धमाका सुरुच, आॅस्ट्रेलिया दौऱ्याची धमाकेदार सुरुवात
–पोस्टर बॉय राहुल चौधरीचा प्रो कबड्डीमध्ये भीमपराक्रम
–हॉकी विश्वचषक २०१८: भारताचे दक्षिण आफ्रिकेवर वर्चस्व कायम
–हॉकी विश्वचषक २०१८: कॅनडाला पराभूत करत बेल्जियमची विजयी सुरूवात