---Advertisement---

धक्कादायक! हाँगकाँग क्रिकेट संघाच्या कर्णधाराला पोलिसांनी केली अटक, ‘हे’ आहेत आरोप

On: गुरूवार, जुलै 22, 2021 10:03 AM
---Advertisement---

हाँगकाँग क्रिकेट संघाचा कर्णधार एजाज खान मोठ्या संकटात अडकला आहे. त्याला हाँगकाँग पोलिसांनी अटक केली आहे. अहवालानुसार,विमा घोटाळ्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे. हा खेळाडू हाँगकाँगच्या ३ दशलक्ष डॉलर विमा घोटाळ्यात सहभागी असल्याचा संशय आहे. त्याने दावा केला होता की, तो अपघातात जखमी झाला आहे. परंतु, तरीदेखील तो सामना खेळताना दिसून आला होता.

एका सूत्राने, पोलिसांना त्याची ओळख पटवून दिली होती,ज्यानंतर एजाज खानला मंगळवारी (२० जुलै) चाई वानमध्ये आपल्या राहत्या घरी पडकण्यात आले होते. हाँग काँग पोलिसांच्या वाणिज्यिक अपराध ब्युरोने असा निष्कर्ष काढला आहे की विमा कंपनीद्वारे त्यांना सूचना दिल्यानंतर हा प्रकार घडला होता.

हाँगकाँग पोलीसांच्या वाणिज्यिक अपराध ब्युरोचे वरिष्ठ अधिकारी लेम हून – चोंग यांनी या प्रकरणात आपले मत मांडत म्हटले होते की, त्याने असा दावा केला होता की दुर्घटनेत त्याला गंभीर दुखापत झाली आहे,ज्यामुळे त्याची कार्यक्षमता कमी झाली आहे. परंतु, तपास केल्यानंतर असे समोर आले की, त्याने पैसे मिळाल्यानंतर १० पेक्षा अधिक स्पर्धेत सहभाग घेणे सुरू ठेवले होते. त्यानंतर विमा कंपनीची मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचा त्याच्यावर संशय आला.

एजाज खानला २०१९ मध्ये हाँगकाँग संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. त्याने आतापर्यंत एकूण ५८ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याला ६२ गडी बाद करण्यात यश आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

श्रीलंकेविरुद्ध अप्रतिम कामगिरी करणाऱ्या धवनची वनडे क्रमवारीत मोठी झेप; तर विराट, रोहित ‘या’ स्थानी कायम

इंग्लंड जिंकेल टी२० विश्वचषक, स्टुअर्ट ब्रॉडने व्यक्त केला विश्वास; ड्वेन ब्रावो, मुरली कार्तिकने ‘अशी’ उडवली खिल्ली

धोनीसाठी जिंकायची आहे चौथ्यांदा आयपीएल ट्रॉफी, सुरेश रैनाने केले मन जिंकणारे वक्तव्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---