2019 विश्वचषकानंतर भारतीय संघाने वेस्ट इंडीज विरुद्ध आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 मालिका खेळल्या. पण या दोन्ही टी20 मालिकेसाठी भारताच्या संघात कुलदीप यादव(Kuldeep Yadav) आणि युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) या फिरकीपटूंना संधी देण्यात आली नव्हती.
त्यामुळे गुरुवारी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने(Sourav Ganguly) टाईम्स ऑफ इंडियाच्या स्तंभलेखात लिहिले आहे की ‘विराट कोहलीने या क्रिकेट प्रकारात(टी20) व्रिस्ट स्पिनर्सला (मनगटाचा वापर करणारे फिरकीपटू) परत आणले पाहिजे.’
‘मला आशा आहे अन्य खेळाडूंना संधी देण्यासाठी केवळ युजवेंद्र चहलला विश्रांती दिली असावी. नाहीतर तो टी20 क्रिकेटमध्ये भारतीय संघात गरजेचा आहे.’
त्याचबरोबर याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी20 मालिका सुरु होण्याआधी कुलदीप आणि चहलला टी20मध्ये संधी न देण्यामागील कारण स्पष्ट करताना भारताचा कर्णधार विराट कोहलीने(Virat Kohli) म्हटले होते की ‘फलंदाजीच्या फळीतील खोली वाढवणे हे कुलदीप आणि चहलला संघात सामील न करण्यामागील एक कारण आहे.’
‘तसेच आम्ही अशा खेळाडूंनाही संधी देऊ इच्छितो, ज्यांनी मागील काही वर्षात देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे.’
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–रिषभ पंतबद्दल प्रशिक्षक रवी शास्त्रींचे मोठे भाष्य, म्हणाले…
–…तर कर्णधार विराट कोहलीवर ओढावू शकते बंदीची नामुष्की
–मराठमोळ्या पंकज मोहितेची प्रो कबड्डी सीजन ७ मध्ये मोठी कामगिरी, केला हा पराक्रम