---Advertisement---

टी20 विश्वचषकात 2007 पासून चालू आहे हा ट्रेंड, यंदाही झाला खरा!

---Advertisement---

पहिला टी20 विश्वचषक 2007 मध्ये खेळला गेला होता. तेव्हापासून आतापर्यंत 9 टी20 विश्वचषक खेळले गेले आहेत. या नऊही विश्वचषकात एक ट्रेंड कायम राहिला, तो म्हणजं यजमान संघानं विश्वचषक न जिंकण्याचा!

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, आजपर्यंत कोणत्याही यजमान संघानं टी20 विश्वचषकाचं विजेतेपद पटकावलेलं नाही. अमेरिकेपाठोपाठ वेस्ट इंडिजही 2024 टी20 विश्वचषकातून बाहेर पडला आहे. त्यामुळे यंदाच्या विश्वचषकातही हा ट्रेंड कायम राहिला. येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, पहिल्या 9 एकदिवसीय विश्वचषकांमध्ये देखील यजमान संघानं विजेतेपद पटकावलं नव्हतं. त्यानंतर 2011 मध्ये 10व्या विश्वचषकात भारतानं ही मालिका खंडित केली. त्यानंतर सलग तीन एकदिवसीय विश्वचषकात यजमान संघानं विजेतेपदावर कब्जा केला!

पहिल्या टी20 विश्वचषकाचं आयोजन 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेत करण्यात आलं होतं. तेव्हा भारतीय संघ चॅम्पियन बनला होता. यानंतर 2009 मध्ये इंग्लंडनं टी20 विश्वचषकाचं आयोजन केलं, जेथे पाकिस्ताननं जेतेपद जिंकलं होतं. 2010 टी20 विश्वचषक वेस्ट इंडिजमध्ये खेळला गेला. येथे इंग्लंडनं जेतेपद जिंकलं. 2012 टी20 विश्वचषक श्रीलंकेत आयोजित करण्यात आला होता, जेथे वेस्ट इंडिजनं बाजी मारली. यानंतर बांगलादेशकडे 2014 टी20 विश्वचषकाच्या यजमानपदाची जबाबदारी होती. हा विश्वचषक श्रीलंकेनं जिंकला होता. 2016 टी20 विश्वचषक भारतात आयोजित करण्यात आला होता, जेथे वेस्ट इंडिजनं जेतेपद जिंकलं होतं.

2021 टी20 विश्वचषक भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) आयोजित केला होता, परंतु सामने यूएई आणि ओमानमध्ये खेळले गेले होते. हा विश्वचषक ऑस्ट्रेलियानं जिंकला होता. यानंतर 2022 मध्ये ऑस्ट्रेलियात टी20 विश्वचषक झाला, पण विजेतेपद इंग्लंडनं पटकावलं.

यावर्षी 2024 टी20 विश्वचषकाचं आयोजन अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये करण्यात आलंय. वेस्ट इंडिजचा संघ या विश्वचषकात जेतेपदाचा प्रबळ दावेदार होता. मात्र सुपर 8 सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव झाल्यानंतर संघ सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

बाबर आझमची नाचक्की! पाकिस्तानच्या संसदेत झाला ट्रोल, खासदारानं घेतली खूप मजा
“अफगाणिस्तान भारताविरुद्ध जाणूनबुजून हरला”, पाकिस्तानी पत्रकाराचे बिनबुडाचे आरोप; आर अश्विनचं प्रत्युत्तर
दक्षिण आफ्रिकेचा यजमानांना दे धक्का! सेमीफायलमध्ये मारली धडक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---