आयपीएल 2018 आखेरच्या टप्यात आलेले असतानाच एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. हॉटस्टारच्या एका जाहिरातीमुळे आयपीएलच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. हॉटस्टारने चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकता नाईट रायडर्स संघात अंतिम सामना होणार असल्याची जाहिरात केली आहे. स्टार नेटवर्कने आयपीएलच्या प्रसरणाचे हक्क विकत घेतले आहेत.
या जाहिरातीच्या व्हिडिओवर हॉटस्टारचे कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही. यामुळे चाहत्यांना आयपीएल फिक्स असल्याचे वाटत आहे. हा व्हिडिओ क्वालिफायर 1 च्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद सामन्यानंतर समोर आला आहे.
हा व्हिडिओ एका निराश झालेल्या चहात्याने फेसबुकवर पोस्ट केला आहे. याच प्रकरणावर एका माध्यमाने विचारलेल्या प्रश्नावरही हॉटस्टारने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.
हॉटस्टारला आयपीएलचे लाईव्ह प्रसारण केल्यामुळे बराच मोठा चाहता वर्ग मिळाला आहे. पण आता या प्रकरणामुळे त्यांना प्रेक्षकांचा विश्वास गमवावा लागत आहे.
https://twitter.com/__angrybiird__/status/999002526572670976
आयपीएलमध्ये उद्या क्वालिफायर 2 चा सामना कोलकता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबादमध्ये होणार आहे. तर 27 मेला अंतिम सामना होईल. चेन्नई सुपर किंग्जने आधीच अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–विराटचं फिटनेस चॅलेंज पंतप्रधान नरेंद्र मोदींना पडलं महागात
–यापेक्षा खतरनाक आकडेवारी तुम्ही एबीबद्दल नक्कीच वाचली नसणार!
-विराट कोहलीच्या काउंटी पदार्पणावर प्रश्नचिन्ह
-कोहली- धोनीसह हे आहेत जगातील टाॅप-१० फेमस खेळाडू
–सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यापर्यंत पोहचलेला एबी!
-भारतीयांचं सर्वाधिक प्रेम मिळालेला परदेशी खेऴाडू आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!