जवळपास सर्वच खेळाडू सोशल मीडिया माध्यमांचा वापर करतात. अशामध्ये काही वेळा खेळाडूंना चाहत्यांचे अनेक प्रकारचे मेसेजेस येतात. अशाच प्रकारचा एक मेसेज भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीला आला होता.
यावेळी चाहत्याने सुनीलकडे (Sunil Chhetri) त्याच्या नेटफ्लिक्स अकाऊंटचा आयडी आणि पासवर्डची मागणी केली होती. तसेच त्याने पुढे लिहिले होते की, लॉकडाऊन संपल्यानंतर तुम्ही तुमच्या अकाऊंटचा पासवर्ड बदलून घ्या.
या मेसेजचा स्क्रीनशॉट सुनीलने काल (शनिवारी २ मे) आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरू शेअर केला होता. यावेळी त्याने ट्वीट केले होते की, “जर्सी नको, फोटोवर ऑटोग्राफ नको, पोस्टवर रिप्लाय नको आणि शेजारच्या मुलाच्या पाळीव कुत्र्याची इच्छा बाळगणारा व्हिडिओही नको. परंतु येथे अशी एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचा प्राधान्यक्रम अगदी सरळ आहे आणि तो मला त्याची मागणी विचार करण्यास मला खरोखर भाग पाडत आहे.”
Jersey ❌
Autograph on a picture ❌
Reply to the post ❌
Video wishing the neighbour's son's pet dog ❌Here's someone who has priorities straight and it's really making me want to consider the demand. 😂 pic.twitter.com/OdBGrS7g5v
— Sunil Chhetri (@chetrisunil11) May 2, 2020
😂😂😂
While we're on the topic, could we also get your autograph on a picture?— Netflix India (@NetflixIndia) May 2, 2020
यानंतर सुनीलने आज (३ मे) नेटफ्लिक्सला प्रत्युत्तर देत विचारले की, “”देवाणघेवाणच करायची तर तुम्ही या मुलाला दोन महिन्याची सबस्क्रिप्शन द्या आणि मी सही केलेला टी शर्ट तसेच फोटो तुम्हाला पाठवतो. बोला आहे मंजूर?”
In the true spirit of a barter, how about you guys hand the kid a two-month subscription and I'll send a signed shirt and a picture your way? Do we have a deal? https://t.co/Ub0WaMcutg
— Sunil Chhetri (@chetrisunil11) May 3, 2020
लॉकडाऊनमध्ये (Lockdown) वेळ घालवण्यासाठी खेळाडूंनी आपला मोर्चा सोशल मीडियाकडे वळवला आहे. अनेक खेळाडू चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी इंस्टाग्राम लाईव्ह चॅटचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-कसोटी क्रिकेटमधील आजपर्यंतची सार्वकालिन आयसीसी क्रमवारी, पहिल्या विसात केवळ एक तर तिसात दोन भारतीय
-२०११ विश्वचषक विजयी संघातील खेळाडू म्हणतो, केएल राहुल होणार टीम इंडियाचा कर्णधार
-जगातील ह्या ५ खेळाडूंच्या आहेत विचित्र क्रमांकाच्या जर्सी
-वनडेत एका डावात १६पेक्षा जास्त षटकार मारणारे ४ खेळाडू