---Advertisement---

दहशतवादी स्वातंत्र्य सैनिक कसे असू शकतात? – माजी पाक क्रिकेटपटूने आपल्या मंत्र्यालाच सुनावले!

On: शुक्रवार, एप्रिल 25, 2025 4:44 PM
LEAD Technologies Inc. V1.01
---Advertisement---

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात दुःखाचे वातावरण आहे. तसेच दहशतवाद्यांविषयी सर्वजण संताप व्यक्त करत आहेत. हा दहशतवादी हल्ला जम्मू-काश्मीरच्या पहलगामच्या बैसरण मध्ये मंगळवार 22 एप्रिल रोजी झाला. ज्यामध्ये निष्पाप 26 जणांचा मृत्यू झाला. यानंतर फक्त भारत देशच नाही तर जगातील कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.

भारत सरकारने या हल्ल्यानंतर शेजारील देश पाकिस्तान विरुद्ध कडक ॲक्शन घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच सिंधू नदीच पाणी पाकिस्तानसाठी बंद करत निर्णय घेतले आहेत. त्यामध्येच आता माजी पाकिस्तान खेळाडूने त्यांच्याच देशातील मंत्र्याला सुनावले आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून सुद्धा प्रतिक्रिया समोर येत आहेत. पाकिस्तानचे डेप्युटी पीएम आणि विदेश मंत्री इशाक डारने या हल्ल्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले पहलगाममध्ये ज्या दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे, त्या दहशतवाद्यांना त्यांनी स्वातंत्र्यसैनिक म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याला माजी पाकिस्तान खेळाडू दानिश कनेरियाने सडेतोड उत्तर दिले आहे.

माजी पाकिस्तानी हिंदू खेळाडू दानिश कनेरियाने त्याच्या सोशल मीडिया अकाउंट एक्सवर एक पोस्ट शेअर करत पाकिस्तानी डेप्युटी पीएमच्या वक्तव्या विरुद्ध संताप व्यक्त केला आहे. त्याने एक्सवर लिहिले आहे की, जेव्हा पाकिस्तानचे उप-पंतप्रधान दहशतवाद्यांना स्वातंत्र्यसैनिक म्हणतात. तर हे फक्त अपमानजनकच नाही तर, हे सुद्धा यामुळे स्पष्ट होत आहे की पाकिस्तान देश दहशतवाद्यांना पूर्णपणे पाठिंबा दर्शवत आहे.

दानिश कनेरियाने याआधी सुद्धा 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यावर शोक व्यक्त केला होता. दानिश सोशल मीडियावर सतत अग्रेसर असतो आणि तो त्याच्याशी जोडलेल्या प्रश्नांची उत्तरे सुद्धा लोकांना देतो. दानिशला एका युजरने विचारले होते की, तुम्ही पाकिस्तानमध्येच राहता आणि पाकिस्तान विरुद्ध बोलता. तुम्हाला याविषयी लाज वाटली पाहिजे. तेव्हा तो म्हणाला मी पाकिस्तान किंवा येथील लोकांच्या विरुद्ध बोलत नाही. पाकिस्तान सर्वात जास्त दहशतवाद्यांशी जोडलेला आहे त्यामुळे येथे अशा सरकारची गरज आहे जो शांतीमध्ये काम करेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---