आयसीसी टी -२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील सुपर -१२ फेरीतील सामन्यांना २३ ऑक्टोबर पासून प्रारंभ झाला आहे. भारतीय संघाचा पहिला सामना पाकिस्तान संघासोबत झाला होता, ज्यामध्ये पाकिस्तान संघाने १० गडी राखून विजय मिळवला होता. तर मंगळवारी (२६ ऑक्टोबर) पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सामन्यात देखील पाकिस्तान संघाने विजय मिळवला. यासह पाकिस्तान संघ उपांत्य फेरीत जाण्यासाठी प्रबळ दावेदार असणार आहे. तसेच भारतीय संघाचा मार्ग देखील यामुळे सोपा झाला आहे.
पाकिस्तान संघ आयसीसी टी -२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या गटाच्या गुणतालिकेत ४ गुणांसह सर्वोच्च स्थानी आहे. तर अफगानिस्तान संघ २ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. तसेच भारतीय संघाला अजूनपर्यंत खाते खोलता आले नाहीये. भारतीय संघ पाचव्या स्थानी आहे. जर भारतीय संघाला उपांत्यफेरीत प्रवेश करायचा असेल, तर पुढील सर्व सामन्यांमध्ये विजय मिळवावा लागणार आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना ठरेल निर्णायक
पाकिस्तान संघाविरुद्ध पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाच्या चिंतेत वाढ झाली आहे. जर स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर येणाऱ्या पुढील सर्व सामन्यांमध्ये विजय मिळवावा लागणार आहे. भारतीय संघाचा पुढील सामना ३१ ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड संघाविरुद्ध होणार आहे. तसेच पाकिस्तान संघाकडून पराभूत झाल्यानंतर, जर न्यूझीलंड संघाला उपांत्यफेरीत प्रवेश करायचा असेल तर त्यांना कुठल्याही परिस्थितीत भारतीय संघाला पराभूत करावे लागेल.
पाकिस्तानमुळे भारतीय संघाला होऊ शकतो फायदा
पाकिस्तान संघाने भारत आणि न्यूझीलंड संघाला पराभूत करत ४ गुणांसह गुणतालिकेत आघाडी घेतली आहे. जर पाकिस्तान संघाने स्कॉटलॅंड, अफगानिस्तान आणि नामिबिया संघाविरुद्ध विजय मिळवला तर, पाकिस्तान संघ १० गुणांसह उपांत्य फेरीत प्रवेश करेल. तसेच भारतीय संघाने न्यूझीलंड संघाला पराभूत करत इतर ३ संघांवर विजय मिळवला तर, भारतीय संघाचे ८ गुण होतील आणि उपांत्य फेरीत जाण्याची शक्यता वाढेल. परंतु जर न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघ पराभूत झाला तर, न्यूझीलंड संघाची उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची शक्यता वाढेल. तसेच भारतासमोरी आव्हान अधिक कठीण होईल.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२०मध्ये भारताविरुद्ध सर्वात कमी वयात सामनावीर पुरस्कार मिळवणारे ३ क्रिकेटर
डी कॉकच्या संघाबाहेर होण्याच्या निर्णयावर कर्णधाराचे मोठी प्रतिक्रिया; म्हणाला…
‘केवळ विजयातच नाही पराभवातही संघाला पाठिंबा द्या’; विश्वविजेत्या खेळाडूचे भारतीय समर्थकांना आवाहन