भारतीय क्रिकेट संघ 19 सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळेल. या मालिकेपूर्वी भारतीय संघातील बहुतांशी खेळाडू दुलिप ट्रॉफी स्पर्धेत खेळणार आहेत. दुलिप ट्रॉफी 5 सप्टेंबरपासून सुरु होईल. मात्र, त्याआधी भारतीय संघाचा वेगवान गोलंदाजी विभाग हा दुखापतग्रस्त असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बांगलादेशविरुद्ध कोणत्या वेगवान गोलंदाजांना संधी मिळणार?, हे पाहावे लागेल.
दुलिप ट्रॉफी स्पर्धेसाठी मोहम्मद सिराज याची निवड झाली होती. मात्र, अचानक झालेल्या दुखापतीमुळे त्याला माघार घ्यावी लागली. सध्या तो बेंगलोर येथे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पोहोचला आहे. भारतीय संघाचा दुसरा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा 2023 वनडे विश्वचषकानंतर कोणताही सामना खेळलेला नाही. तसेच, दुलिप ट्रॉफी व बांगलादेशविरुद्ध खेळण्याची त्याची शक्यता अत्यंत कमी आहे. यासोबतच युवा उमरान मलिक हा देखील डेंग्यूच्या आजारातून सावरल्यानंतर आपला फिटनेस मिळवताना दिसतोय. त्याने देखील याच कारणाने दुलिप ट्रॉफीमधून माघार घेतली होती.
या सर्वांव्यतिरिक्त जसप्रीत बुमराह याला वर्कलोड मॅनेजमेंटमुळे या दोन्ही स्पर्धेत खेळवणार नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. अशा स्थितीत दुलिप ट्रॉफीमध्ये खेळणाऱ्या इतर भारतीय गोलंदाजांकडे तितका अनुभव नाही. दुलिप ट्रॉफीसाठी निवड झालेल्यांपैकी मुकेश कुमार हा सर्वाधिक तीन कसोटी सामने खेळला आहे. तर, प्रसिद्ध कृष्णा याने दोन व आकाशदीप याने एक कसोटी सामना खेळलाय.
असे असले तरी दुलिप ट्रॉफीमध्ये काही युवा वेगवान गोलंदाज खेळताना दिसणार आहेत. यामध्ये आवेश खान, खलिल अहमद, तुषार देशपांडे, हर्षित राणा हे भारताच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळलेले गोलंदाज आहेत. या व्यतिरिक्त विद्वत कवीरप्पा, विजयकुमार वैशाख व यश दयाल हेदेखील दुलिप ट्रॉफी खेळतील. या उपलब्ध असलेल्या पर्यायांपैकी बांगलादेशविरुद्ध कोण खेळणार, हे 15 तारखेच्या आसपास समजेल.
हेही वाचा –
रोहित शर्मा मुंबई इंडियन्समध्येच कायम राहणार? MI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
आयपीएल 2024 ला मिळाली विक्रमी लोकप्रियता! जिओ सिनेमानं मोडले पूर्वीचे सर्व रेकॉर्ड
फिंच-गुप्टिलपासून आरपी सिंग दिलशानपर्यंत; लिजेंड्स लीगमध्ये हे दिग्गज खेळाडू राहिले अनसोल्ड