चेन्नई येथील सामन्याद्वारे भारत आणि इंग्लंड संघामधील बहुचर्चित ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेत भारतीय संघाला विजयाचा दावेदार मानले जात होते मात्र,पहिल्या सामन्यात इंग्लंडने भारताचा एकतर्फी पराभव केला. भारताच्या क्रिकेट इतिहासात चेन्नई येथे हा भारताचा ७ वा पराभव ठरला आहे. विशेष म्हणजे यात ४ वेळा इंग्लंडकडूनच भारताला पराभव स्विकारावा लागला आहे.
चेन्नई येथे भारताचा पहिला पराभव १९३४ झाली इंग्लंड विरुद्ध झाला. यानंतर दुसरा पराभव वेस्ट इंडिज विरुद्ध १९४९ साली व तिसरा पराभव १९६९ साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध झाला होता. यानंतर भारताला १९७७ व १९८५ साली इंग्लंडकडून पराभव सहन करावा लागला. २०२१ पूर्वी चेन्नई येथे भारताचा शेवटचा पराभव १९९९ साली पाकिस्तान विरुद्ध झाला होता.
महा स्पोर्ट्सचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
दरम्यान नुकत्याच पार पडलेल्या कसोटी सामन्याचा विचार केला असता, येथे इंग्लंडने संपूर्ण सामन्यात शानदार कामगिरी केली. विशेष म्हणजे या सामन्यात भारतीय फलंदाजांनी मोठी निराशा केली. भारताचा पहिला डाव ३३७ धावांवर संपुष्टात आला होता. भारताकडून रिषभ पंतने ९१, चेतेश्वर पुजाराने ७३ आणि वॉशिंग्टन सुंदरने नाबाद ८५ धावांची अर्धशतकी खेळी केली होती. त्याआधी इंग्लंडने जो रुटच्या २१८ धावांच्या द्विशतकी आणि डॉम सिब्ली(८७) व बेन स्टोक्सच्या(८२) अर्धशतकाच्या जोरावर पहिल्या डावात ५७८ धावा उभारल्याने त्यांनी पहिल्या डावात २४१ धावांची आघाडी घेतली होती.
यानंतर इंग्लंडने फॉलोऑन न देता दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी दुसऱ्या डावात सर्वबाद १७८ धावा केल्या आणि पहिल्या डावातील २४१ धावांच्या आघाडीसह भारताला ४२० धावांचे आव्हान दिले होते. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात भारताकडून आर अश्विनने सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या होत्या.
त्यानंतर ४२० धावांचा पाठलाग करताना भारताकडून कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक ७२ धावा केल्या. त्याच्यापाठोपाठ शुबमन गिलने ५० धावांची खेळी केली. अन्य कोणत्याही फलंदाजाला २० धावांचा टप्पाही पार करता आला नाही. इंग्लंडकडून या डावात जॅक लीचने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर जेम्स अँडरसनने ३ विकेट्स घेतल्या. याशिवाय डॉमनिक बेस बेन स्टोक्सने आणि जोफ्रा आर्चरने प्रत्येकी १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या-
–बुढ्ढे में है दम! पहिल्या कसोटीत इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार ठरलेला अंडरसन अनेकार्थाने ठरलाय ऐतिहासिक खेळाडू
–काय सांगता! पराभवाचे खापर फुटले रहाणेवर? माजी क्रिकेटपटूने रहाणेच्या फलंदाजीवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह
–रोहित-विराटसारखे दिग्गज संघात असूनही टीम इंडिया का झाली पराभूत? जाणून घ्या पाच ठळक कारणं
–इंग्लंड नडतेच, आजवर इतक्यांदा केलंय टीम इंडियाला मायभूमीत चितपट






