रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी आयपीएल 2024 चा हंगाम आतापर्यंत फारच खराब राहिला आहे. संघानं गेल्या सलग 4 सामन्यांमध्ये पराभव पचवलेला आहे. सध्या आरसीबी 6 सामन्यांमध्ये अवघ्या 2 गुणांसह गुणतालिकेत तळाशी आहे. आता आरसीबीच्या चाहत्यांना हा प्रश्न पडला असेल की, 10व्या स्थानी असून देखील टीम प्लेऑफ साठी पात्र ठरू शकते का? चला तग मग या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया.
दिल्ली विरुद्ध लखनऊ सामन्यापूर्वी आरसीबी गुणतालिकेत 9व्या स्थानी होती. मात्र दिल्लीच्या विजयानंतर आरसीबीची दहाव्या स्थानी घसरण झाली आहे. मात्र अजूनही प्लेऑफ संदर्भात काहीही बोललं जाऊ शकत नाही. आरसीबीनं या हंगामात आतापर्यंत 6 सामने खेळले असून, ज्यापैकी त्यांना केवळ एका सामन्यात विजय मिळाला आहे.
आरसीबीला अजूनही 8 सामने खेळायचे आहेत. जर ते उरलेले आठही सामने जिंकण्यात यशस्वी ठरले तर त्यांचे 18 गुण होतील. प्लेऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी एवढे गुण पुरेसे आहेत. गेल्या हंगामात प्लेऑफमध्ये क्वॉलिफाय करणाऱ्या 4 संघांचे गुण क्रमश: 20, 17, 17 आणि 16 एवढे होते. आता हे पाहणं महत्त्वाचं असेल की आरसीबी यंदा क्वालिफाय करते की नाही.
तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, 2009 आणि 2011 मध्ये देखील आरसीबीची परिस्थिती अशीच होती, जेव्हा त्यांनी सलग 4 सामने गमावले होते. मात्र तरी देखील टीमनं प्लेऑफमध्ये जागा मिळवली होती. विशेष म्हणजे या दोन्ही हंगामात आरसीबीबी फायनलपर्यंत पोहचली होती. मात्र दोन्ही वेळा संघाला अंतिम सामन्यात मात मिळाली.
2009 च्या अंतिम सामन्यात डेक्कन चार्चर्स हैदराबादनं आरसीबीचा पराभव केला होता. तर 2011 मध्ये चेन्नई सुपर किंग्जनं त्यांच्यावर मात केली होती. 2016 मध्ये देखील आरसीबीचा पहिल्या 7 पैकी 5 सामन्यांमध्ये पराभव झाला होता. मात्र त्या हंगामात संघानं शानदार कमबॅक करत फायनलपर्यंत मजल मारली होती. 2016 मध्ये जेतेपदाच्या लढतीत आरसीबीचा सनरायझर्स हैदराबादकडून पराभव झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबई विरुद्ध चेन्नई सामन्यापूर्वी एकत्र दिसले सचिन, धोनी आणि रोहित! नक्की काय शिजतंय?
विजय दिल्लीचा, पराभव लखनऊचा पण दणका बसला बंगळुरुला! नेमकं काय घडलंय? आरसीबीसाठी यंदाही वाटचाल कठीण