टोकियो ऑलिंपिकमध्ये मिराबाई चानूने पहिले पदक जिंकून भारताची मान उंचावली आहे. याचबरोबर तिने दाखवून दिले आहे की, कोणतीही समस्या आपल्याला विजय मिळवण्यापासून थांबवू शकत नाही. अडचणी नक्कीच त्रास देतात, पण या सर्व अडचणींवर तिने मात केली आहे. टोकियो ऑलिंपिक संपवून मिराबाई चानूचे भारतात जोरदार स्वागत झाले.
त्याच बरोबर तिला रोखरक्कम स्वरूपात बक्षिसे दिले गेले आहे. पण जर चानूचा जीवन संघर्ष पाहिला, तर कळेल की, तिने काय भोगले आणि इथपर्यंत पोहोचण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींचा त्याग केला आहे. मिराबाईला ट्रक ड्रायव्हर्सने मदत केली होती. त्यामुळे तिला मदत करणाऱ्या ट्रक ड्रायव्हर्सला भेटायचे आहे. हे ट्रक ड्रायव्हर चानूला त्याच्या नोंगपोक काकचिंग गावातून दररोज खुमान लुंपक क्रीडा संकुल प्रशिक्षण केंद्रावर सोडत होते. त्याचबरोबर ते तिच्याकडून पैसेदेखील घेत नव्हते. (How the truck driver helped silver medalist weightlifter Mirabai Chanu, revealed herself)
— Saikhom Mirabai Chanu (@mirabai_chanu) July 30, 2021
प्रत्येक ऍथलिटचे स्वप्न असते की, ऑलिंपिकमध्ये आपल्या देशासाठी एखादे तरी पदक जिंकावे. वेटलिफ्टर मिराबाई चानूचीही देशासाठी पदक जिंकण्याची इच्छा होती. त्याचबरोबर तिच्या अथक परिश्रमाने तिने हे स्वप्न पूर्ण देखील केले आहे. तिने टोकियो ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक जिंकले आहे. चानूचे कुटुंब गरिबीत जीवन जगत होते. त्याच्या पालकांना दररोज तिला प्रशिक्षण देणे परवडत नव्हते.
मिराबाई चानूच्या घरापासून प्रशिक्षण केंद्र सुमारे ३० किलोमीटर दूर होते. तिला प्रशिक्षण केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी तिला १०-२० रुपये दिले जात होते, पण ते देखील तिला पोहोचण्यासाठी कमी होते. त्यावेळी चानूने एक शक्कल लढवली. चानू तेथून प्रशिक्षण केंद्राला जाण्यासाठी ट्रक ड्रायव्हरकडून लिफ्ट मागत असायची. तिला याचा संकोच आणि भीती दोन्ही वाटत असायची. पण तिने हिम्मत केली आणि ट्रकने प्रशिक्षण केंद्रात जायला सुरुवात केली. काही दिवसांनंतर ट्रक ड्रायव्हर्स आणि तिची ओळख झाली. म्हणून ते दुरूनच हॉर्न द्यायचे, जेणेकरून तिथे पोहोचेपर्यंत मिराबाई तयार होऊन बाहेर येईल.
This silver medal is even more special because of the love people of India and my state Manipur have shown me. I'm grateful to each and every person who came today to congratulate me and gave me their blessings. pic.twitter.com/f5ltSNqHXo
— Saikhom Mirabai Chanu (@mirabai_chanu) July 27, 2021
काही दिवसांनी चानू आणि ट्रक ड्रायव्हरचे चांगले संबंध निर्माण झाले होते. ड्रायव्हर्स दुरून हॉर्न वाजवायचे, जेणेकरून तिला समजावे की, ते जवळ आले आहेत आणि ती तयार व्हावे. ट्रक ड्रायव्हर पैसे देखील घेत नसायचे. चानू घरातून जाण्यासाठी जे पैसे मिळायचे, त्याचे ती प्रशिक्षणादरम्यान खाण्यासाठी पदार्थ खरेदी करायची.
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबई इंडियनच्या ताफ्यात नव्या भारतीय सदस्याची एंट्री, नावावर आहेत ५००पेक्षा जास्त विकेट्स
‘हे’ ३ भारतीय फलंदाज आहेत ‘लंबी रेस का घोडा’! मोडू शकतात सचिनचा मोठा विश्वविक्रम
असे ४ प्रसंग, जेव्हा कसोटी सामन्यात एकाच दिवशी बनल्या होत्या ५०० हून जास्त धावा