1 ऑगस्टपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड संघात सुरु होणाऱ्या ऍशेस मालिकेने आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपचीही सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा 2 वर्षे चालणार आहे. या स्पर्धेतील अंतिम सामना जून 2021 मध्ये होणार आहे.
ही चॅम्पियनशीप स्पर्धा आयसीसीचे कसोटी सदस्य असणाऱ्या 12 देशांपैकी 9 देशांच्या संघात पार पडणार आहे. यामध्ये भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, न्यूझीलंड, श्रीलंका, बांगलादेश आणि वेस्ट इंडीज या 9 देशांचा समावेश आहे.
तसेच 9 संघांना प्रत्येकी 8 प्रतिस्पर्ध्यांपैकी 6 संघांविरुद्ध कसोटी मालिका खेळाव्या लागणार आहे. यामध्ये तीन मालिका घरच्या मैदानावर तर तीन मालिका परदेशात खेळायच्या आहेत. या मालिका 2 ते 5 सामन्यांच्या असतील.
या चॅम्पियशीपमध्ये होणाऱ्या प्रत्येक मालिकेसाठी एकूण 120 गुण असतील. म्हणजेच जर दोन सामन्यांची मालिका असेल तर या मालिकेतील एक सामना जिंकणाऱ्या संघाला 60 गुण मिळतील.
पण सामना जर अनिर्णित राहिला तर दोन्ही संघाला प्रत्येकी 20 गुण आणि जर बरोबरी झाली तर दोन्ही संघाला प्रत्येकी 30 गुण दिले जातील. पराभूत होणाऱ्या संघाला एकही गुण मिळणार नाही
जर मालिका 3 सामन्यांची झाली तर एका सामन्यात जिंकणारा संघ 40 गुण मिळवेल. तर अनिर्णित झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी 13 गुण आणि बरोबरी झाली तर दोन्ही संघांना प्रत्येकी 20 गुण दिले जातील.
या कसोटी चॅम्पियनशिपमध्ये साखळी फेरीनंतर ज्या दोन संघांचे सर्वाधिक गुण असतील या दोन संघात जून 2021 मध्ये लॉर्ड्सवर अंतिम सामना पार पडेल.
या कसोटी चॅम्पियनशीपमध्ये भारतीय संघ वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश या संघांविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे.
कसोटी चॅम्पियनशिपमध्ये असे मिळणार गुण –

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–असे आहे टीम इंडियाचे कसोटी विश्वचषकाचे वेळापत्रक
–टीम इंडियाला वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी मिळणार नवीन ट्रेनर
–युवा यष्टीरक्षक रिषभ पंत माजी कर्णधार एमएस धोनीबद्दल म्हणतो…






