---Advertisement---

दिवस-रात्र कसोटी सामन्यासाठी अशी असेल खेळपट्टी, गांगुलीने केला खूलासा

On: शनिवार, नोव्हेंबर 16, 2019 6:23 PM
---Advertisement---

22 नोव्हेंबरपासून भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघात ईडन गार्डन, कोलकाता (Eden Garden, Kolkata) येथे दुसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. हा सामना दिवस-रात्र कसोटी सामना असल्याने ऐतिहासिक कसोटी सामना ठरणार आहे.

हा भारताचा पहिलाच दिवस-रात्र कसोटी (Day-Night Test Match) सामना असून भारतीय संघ या सामन्यात पहिल्यांदाच गुलाबी चेंडूने (Pink Ball) खेळणार आहे.

बीसीसीआयचे नवे अध्यक्ष सौरव गांगुली (BCCI President Sourav Ganguly) यांनी दिवस-रात्र कसोटी सामना भारतात खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.

“ही एक चांगली खेळपट्टी असेल. हे सर्व क्यूरेटर कशा पद्धतीने खेळपट्टी तयार करतो यावर सर्व अवलंबून आहे,” असे पीटीआयच्या वृत्तानुसार गांगुली म्हणाला.

गुलाबी चेंडू हा वेगासाठी अनुकूल मानला जातो. त्यामुळे ईडन गार्डनच्या खेळपट्टीवर गवत ठेवले जाऊ शकते. परंतु, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी भारताच्या या ऐतिहासिक कसोटी सामन्यासाठी चांगली खेळपट्टी तयार केली जाईल असे आश्वासन दिले आहे.

एसजी कंपनीच्या चेंडूची शिलाई कूकाबुरा कंपनीच्या चेंडूच्या शिलाईपेक्षा वेगळी असते. यामध्ये फिरकीपटूंसाठीही काही मदत असू शकते. या ऐतिहासिक सामन्याला खास बनवण्यासाठी बंगाल क्रिकेट असोसिएशनकडे एक मोठी योजना आहे, असे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली पुढे म्हणाला.

या ऐतिहासिक कसोटी सामन्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamta Banerjee) आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना (PM Sheikh Hasina) यांना ईडन गार्डन कोलकातामध्ये आमंत्रित केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---