भारतीय १९ वर्षाखालील संघ सध्या जोरदार कामगिरी करत आहे. नुकतीच दुबईमध्ये १९ वर्षाखालील आशिया चषक (Under 19 Asia cup) स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत भारतीय १९ वर्षाखालील संघाने श्रीलंका १९ वर्षाखालील संघाला पराभूत करत, जेतेपदावर नाव कोरले. यासह आगामी १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेसाठी आपली तयारी दर्शवली आहे. दरम्यान या संघाचे मुख्य प्रशिक्षक ऋषिकेश कानिटकर (Hrishikesh kanitkar) यांनी या संघाच्या कामगिरीबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
ऋषिकेश कानिटकर (hrishikesh kanitkar statement) यांनी म्हटले की, “माझ्या मते हे योग्य दिशेने टाकलेले पाऊल आहे. आमच्या बहुतेक खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आणि आम्ही सामने जिंकले. स्पर्धेतील भारताचा एकमेव पराभव साखळी फेरीत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून झाला. पाकिस्तानला उपांत्य फेरीत श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला.”
विजयात जास्तीत जास्त खेळाडूंनी दिले मोलाचे योगदान
ऋषिकेश कानिटकर यांनी म्हटले की, “आम्हाला काही खेळाडूंवर अवलंबून राहायचे नव्हते. हे प्रशिक्षणाच्या दृष्टीने एक चांगलं लक्षण आहे. जेव्हा जास्तीत जास्त खेळाडू विजयात योगदान देत असतात त्यावेळी मोजक्या खेळाडूंवर अवलंबून राहायची आवश्यकता भासत नाही. सामने खूप कठीण होते आणि पाचपैकी तीन सामन्यांमध्ये आम्हाला खडतर झुंज मिळाली.”
विश्वचषक हे मोठे लक्ष्य आहे
तसेच ते पुढे म्हणाले की, “सामन्याच्या सरावाच्या दृष्टीने ही चांगली तयारी आहे आणि आमच्यासमोरचे मोठे लक्ष्य हे विश्वचषक आहे. आम्ही एकावेळी एकाच सामन्यावर लक्ष केंद्रित करण्याचा विचार करत आहोत. वेस्ट इंडिजमधील विलगीकरण संपल्यानंतर आम्ही सराव सुरू करू आणि त्यानंतर सराव सामन्यांवर लक्ष केंद्रित करू.” १९ वर्षाखालील विश्वचषक (icc under 19 world cup) स्पर्धा १४ जानेवारीपासून ५ फेब्रुवारीपर्यंत पार पडणार आहे. या संघाचे कर्णधारपद यश धुलच्या हाती देण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या :
लहानग्या वामिकाने पहिल्यांदाच अनुष्काला म्हटले ‘मम्मा’; तिचा आवाज ऐकून म्हणाल, ‘किती गोड’!
INSvsRSA: द. आफ्रिकन कर्णधाराची टीम इंडियाला चेतावणी; म्हणाला, ‘डी कॉक गेल्याचा आम्हाला फरक…’
हे नक्की पाहा :