दिग्गज भारतीय फिरकीपटू हरभजन सिंग सोशल माध्यमांद्वारे लोकांसोबत संपर्कात राहण्याचा प्रयत्न करीत असतो. काही दिवसांपूर्वीच त्याने आपला स्वयंपाकाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर टाकून आपली सुप्त कला लोकांना दाखवली होती. परंतु आता हरभजन सिंगने “ऑपरेशन ब्लू स्टार”च्या 37 व्या वर्षपूर्ती निमित्ताने आपल्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेयर केली होती. या स्टोरीमुळे तो क्रिकेटरसिकांच्या निशाण्यावर आला आहे.
हरभजनने शेअर केलेल्या स्टोरीमध्ये त्याने खलिस्तानी म्होरक्या जनरल भिंद्रानवाले याचा फोटो टाकला होता. त्यासोबतच त्याने फोटोखाली लिहिले होते की, ‘शहिदांना वंदन’. यामुळे हरभजनला मोठ्या प्रमाणात विरोध सुरू झाला आणि ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागला.
आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये भज्जीने लिहिले होते की, ‘सन्मानाने जगणे आणि धर्मासाठी प्राण अर्पण करणे. 1 जून ते 6 जून 1986 दरम्यान सचखंड हरमंदिर साहेबमध्ये शहिद झालेल्या शहिदांना वंदन.’ हरभजनच्या याच पोस्टवरून त्याला टिकेचा सामना करावा लागला आणि सोशल मीडियाद्वारे लोकांच्या वाढलेल्या विरोधामुळे त्याने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
My heartfelt apology to my people..🙏🙏 pic.twitter.com/S44cszY7lh
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) June 7, 2021
आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटद्वारे ट्विट करताना त्याने लिहिले की, ‘ती माझी चूक होती आणि त्या चुकीचा मी स्वीकार करतो. मी जी पोस्ट शेयर केली होती आणि त्यात ज्यांचा फोटो होता. त्यांना मी कुठल्याही प्रकारचे समर्थन करत नाही. मी हाडाचा शीख आहे, जो देशासाठी लढणार, ना की देशाविरुद्ध. जर यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्यांची बिनशर्त माफी मागतो. आपल्या भारताविरुद्ध, इथल्या लोकांविरुद्ध असलेल्या कोणत्याही गटाचे समर्थन मी कधी केले नाही किंवा करणारही नाही. या देशासाठी मी 20 वर्ष मेहनत करून एकप्रकारे देशसेवाच केली आहे. त्यामुळे अशा कोणत्याही घटनेचे मी कधीही समर्थन करणार नाही. जय हिंद.’
त्याच्या या माफीनाम्यानंतरही अनेकांनी त्याच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ दिग्गजाच्या नेतृत्त्वाखाली खेळायचं आहे, SRHच्या अव्वल गोलंदाज राशिदची इच्छा
लाईव्ह सामन्यात आपल्याच संघसहकाऱ्याला धडकला जो रूट अन् झालं असं काही
जवळपास ठरलं! १२७च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी करणारा ‘हा’ भारतीय श्रीलंका दौऱ्यावर करणार नेतृत्त्व