बेंगळूरू। भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात चालू असलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी रिकामे स्टँड्स पहायला मिळाले आहेत. अफगाणिस्तानच्या कसोटी पदार्पणाच्या या सामन्यात पहिल्या तासाभरात फक्त 600-700 प्रेक्षकांची उपस्थिती होती.
या सामन्यासाठी भारताचे केंद्रीय क्रिडामंत्री राज्यवर्धन सिंग राठोड तसेच अफगाणिस्तानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अब्दुल्ला अब्दुल्ला, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आतिफ मशाल, अफगाणिस्तानमध्ये जन्म झालेले भारताचे माजी कसोटीपटू सलीम दुरानी उपस्थित असतानाही चहात्यांनी मात्र या सामन्याकडे पाठ फिरवली आहे.
आयसीसी नेहेमीच क्रिकेटला प्रसिद्धी देण्यासाठी प्रयत्न करत असते. परंतू या सामन्यातील प्रेक्षकसंख्या ही खेळाच्या विकासासाठी नक्कीच चांगली गोष्ट नाही. आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव रिचर्डसनही प्रेक्षकांच्या अनुउपस्थितीवर नाराज आहेत.
चाहत्यांच्या अनुपस्थितीबद्दल कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनचे अधिकारी यांनी सामना जसाजसा पुढे सरकेल तसे चाहते सामन्याला हजेरी लावतील अशी आशा व्यक्त केली आहे. काही अधिकार्यांनी असे मत मांडले की सुट्टीचा दिवस नसल्याने चाहत्यांची अनुपस्थिती जाणवत आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–टाॅप ५- कसोटीच्या पहिल्याच दिवशी लंचपुर्वी शतकी खेळी करणारे खेळाडू
–न्यूझीलंडच्या महिला क्रिकेटरने मोडला स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागचा विक्रम
–टाॅप४- या संघांसोबत केले आहे सर्वाधिक संघांनी कसोटी पदार्पण