---Advertisement---

नाद करा पण आमचा कुठं! टीम इंडियाच्या 100 धावा पूर्ण, रोहित अन् गिलचे झंझावाती अर्धशतक

Rohit-Sharma-And-Shubman-Gill
---Advertisement---

आशिया चषक 2023 सुपर- 4 फेरीतील तिसऱ्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी भारत विरुद्ध पाकिस्तान संघ आमने-सामने आहेत. या सामन्यात पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि भारतीय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारतीय सलामीवीरांनी बाबरचा हा निर्णय प्राथमिकरीत्या चुकीचा ठरवत झंझावाती फलंदाजी करत 13.3 षटकातच भारतीय संघाच्या 100 धावा पूर्ण करण्यात मोलाचा वाटा उचलला.

यावेळी सलामीवीर रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांच्यात 13.2 षटकातच 100 धावांची भागीदारी झाली. तसेच, यावेळी दोघांनी अर्धशतकही पूर्ण केले. रोहितने 42 चेंडूत 50 धावा केल्या. तसेच, शुबमनने 37 चेंडूत 50 धावा करत अर्धशतक साकारले. यामध्ये 10 चौकारांचा समावेश होता.

रोहित अर्धशतक केल्यानंतर फार काळ मैदानावर टिकू शकला नाही. तो या सामन्यातील 17वे षटक टाकत असलेल्या शादाब खान याच्या चौथ्या चेंडूवर झेलबाद झाला. त्याला फहीम अश्रफ याने झेलबाद केले. रोहित बाद झाला, तेव्हा भारतीय संघाची धावसंख्या 1 बाद 121 धावा इतकी होती. रोहितने या सामन्यात 49 चेंडूत 56 धावा केल्या. यामध्ये 4 षटकार आणि 6 चौकारांचा समावेश होता.

सुपर- 4मधील तिसऱ्या सामन्यासाठी उभय संंघ
भारत प्लेईंग इलेव्हन– रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, हार्दिक पंड्या, ईशान किशन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज

पाकिस्तान प्लेईंग इलेव्हन- फखर झमान, इमाम उल हक, बाबर आझम (कर्णधार), सलमान अली, मोहम्मद रिझवान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहिम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ व नसीम शाह. (Hundred runs for india Gill & Rohit score fifty ind vs pak)

हेही वाचाच-
बदला घेतलाच! पहिल्याच ओव्हरमध्ये हिटमॅनने शाहिनला भिरकावला, पाहा कडक सिक्स
श्रेयस पुन्हा दुखापतग्रस्त! पाठीच्या दुखण्याने खाल्ली उचल, वर्ल्डकपआधी वाढली चिंता

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---