---Advertisement---

माजी दिग्गजाने भारतीय फलंदाजांना सांगितला शाहीन आफ्रिदीचा तोडगा; म्हणाला, ‘पहिल्या 15 ओव्हर…’

Shaheen-Afridi
---Advertisement---

भारत विरुद्ध पाकिस्तान संघ रविवारी (दि. 10 सप्टेंबर) आशिया चषक 2023 स्पर्धेच्या सुपर- 4 फेरीतील महत्त्वाच्या सामन्यात आमने-सामने आहेत. या सामन्यात नाणेफेक गमावत भारत प्रथम फलंदाजी करणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या माजी सलामीवीराने शाहीन शाह आफ्रिदी याचा सामना करण्यासाठी भारतीय फलंदाजांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. त्याने म्हटले आहे की, भारतीय फलंदाजांनी शाहीनच्या हिशोबाने नाही, तर चेंडूच्या हिशोबाने खेळावे.

काय म्हणाला आकाश चोप्रा?
आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) संघातील मागील सामन्यात शाहीन आफ्रिदी याने भारतीय संघाच्या फलंदाजांना चांगलाच त्रास देत तंबूत पाठवले होते. अशात भारताचा माजी सलामी फलंदाज आकाश चोप्रा याला विश्वास आहे की, रोहित शर्मा (Rohit Sharma) याने शाहीनच्या नावावर न जाता त्याच्या चेंडूच्या हिशोबाने फलंदाजी करावी.

आकाशने त्याच्या युट्यूब चॅनेलवर बोलताना म्हटले की, “पाकिस्तानविरुद्ध तुम्ही चेंडू पाहून खेळा. पहिल्या 15 षटकात एकापेक्षा जास्त  विकेट्स गमावू नका. शाहीन शाह आफ्रिदी सध्या कोणत्याही भाड्याशिवाय आपल्या डोक्यात राहतोय. हे खरंय की, तो आपल्या डोक्यात आहे आणि तो एकटाच नाहीये. त्याच्यासोबत नसीम शाह आणि हॅरिस रौफ हेदेखील आहेत. जेव्हा हे तिघे आक्रमण करतात, तेव्हा तुम्हाला पुन्हा घेरतात. आमचे प्रशिक्षक म्हणत होते की, तुम्हाला गोलंदाजांना खेळण्याची गरज नाही. त्यांच्या हातातून फक्त चेंडू येईल आणि त्याला खेळण्याची गरज आहे. त्यामुळे गोलंदाजाची ख्याती विसरून जावा.”

या स्पर्धेत पाकिस्तानी गोलंदाज शानदार प्रदर्शन करत आहेत. शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि हॅरिस रौफ यांनी जबरदस्त गोलंदाजी केली आहे. या तिघांनीही प्रत्येक सामन्यात घातक वेगवान गोलंदाजी करत विरोधी संघांना जास्त धावा करू दिल्या नाहीयेत. रौफने आतापर्यंत सर्वाधिक 9 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, आफ्रिदीने मागील सामन्यात रोहित शर्मा, विराट कोहली (Virat Kohli), हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजा यांची विकेट घेतली होती. (former cricketer big advice for indian batters to tackle shaheen shah afridi)

हेही वाचाच-
भविष्यवाणीचे सत्र थांबेना! आता स्टीव्ह स्मिथ म्हणाला, ‘या’ 2 संघात होईल World Cup 2023ची Final
भारताविरुद्ध भिडण्यापूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का! वनडेतील बादशाहत संपुष्टात, ऑस्ट्रेलिया पुन्हा नंबर 1

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---