---Advertisement---

आयर्लंडविरुद्धच्या दमदार कामगिरीनंतर राशिदने केले मोठे वक्तव्य, म्हणाला…

On: बुधवार, जानेवारी 27, 2021 5:48 PM
---Advertisement---

अफगाणिस्तान आणि आयर्लंड यांच्यादरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका अबुधाबी येथे नुकतीच संपन्न झाली. या तिन्ही सामन्यात विजय मिळवला अफगाणिस्तानने आयर्लंडला व्हाईटवॉश दिला. या मालिकेत प्रभावशाली कामगिरी करणाऱ्या अफगाणिस्तानचा प्रमुख फिरकीपटू राशिद खानने स्वतःला अष्टपैलू म्हटले आहे. एका मुलाखतीत बोलताना त्याने हे उद्गार काढले.

मी स्वतःला अष्टपैलू मानतो

अबुधाबी येथे संपलेल्या आयलँड विरुद्धच्या वनडे मालिकेत राशिदने फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही विभागात दमदार कामगिरी केली होती. या कामगिरीसाठी राशीला मालिकावीराचा पुरस्कार देखील देण्यात आला होता. आपल्या इंस्टाग्रामवरून बोलताना राशिदने म्हटले, “मी माझ्या कारकिर्दीची सुरुवात फलंदाज म्हणून केली होती. मात्र, पुढे मी गोलंदाजीवर लक्ष केंद्रित केले. सध्या मी फलंदाजीतील बारकावे शिकून घेत आहे. मला अशी काही क्षेत्रे सापडली ज्यामध्ये सुधारणेची आवश्यकता आहे. भविष्यात मला एक उत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून घेण्यास आवडेल.”

आयर्लंड विरुद्ध राशिदने केली जबरदस्त कामगिरी

राशिदने आयर्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेत चमकदार अष्टपैलू कामगिरी केली. राशिदने पहिल्या सामन्यात ५५ धावा व २ बळी मिळवले. दुसऱ्या सामन्यातही एक बळी त्याच्या नावे राहिला. मालिकेतील अखेरच्या सामन्यात रशिदने पुन्हा आपल्यातील अष्टपैलू खेळाडूचे दर्शन घडवत आधी ४९ धावा झोडल्या व गोलंदाजी करताना २९ धावा देत ४ आयरीश फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. राशिद ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग अर्ध्यावर सोडून या मालिकेसाठी अबुधाबी येथे दाखल झाला होता. तो बिग बॅश लीगमध्ये ऍडलेड स्ट्रायकर्स संघाचे प्रतिनिधित्व करतो.

महत्वाच्या बातम्या:

विराट सापडला कायद्याच्या कचाट्यात, मिळाली कायदेशीर नोटीस

फ्लॅशबॅक! २०१२ साली इंग्लंडविरुद्ध झालेल्या मालिकेनंतर धोनी-गंभीर वाद आला होता चव्हाट्यावर

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी : बडोद्याचा उपांत्यपूर्व फेरीत रोमांचक विजय, विष्णू सोळंकी ठरला नायक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---