भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली चांगल्या फॉर्ममध्ये परतताना दिसत आहे. आशिया चषकात त्याने मोठ्या विश्रांतीनंतर पुनरागमन केले आणि सध्या चांगले प्रदर्शन देखील करत आहे. तो आयपीएलनंतर भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्यात देखील चांगले प्रदर्शन करू शकला नव्हता. पण आशिया चषकात चकदार प्रदर्शन करत आहे. रविवारी (4 सप्टेंबर) पाकिस्तानविरुद्ध खेळताना विराट लयीत दिसला. दरम्यान, या सामन्यात उपस्थित विराटची एक चाहती सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
भारत आणि पाकिस्तान ग्रुप स्टेजमधील सामन्यानंतर आशिया चषकातील सुपर फोर फेरीत रविवारी दुसऱ्यांदा आमने सामने आले होते. उभय संघातील पहिली लढत 28 ऑगस्ट रोजी झाली होती आणि पाकिस्तानला यामध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. परंतु सुपर फोरमध्ये मात्र पाकिस्तानने भारताला 5 विकेट्सच्या अंतराने मात दिली. विराट कोहली (Virat Kohli) या सामन्यात 44 चेंडू खेळला आणि यामध्ये 60 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. यादरम्यान त्याने 4 चौकार आणि 1 षटकार देखील मारला.
फक्त विराटला पाहण्यासाठी आली होती त्याची मोठी चाहती
विराटची एक सुंदर चाहती या सामन्यात त्याला पाहण्यासाठी आली होती. विराटचे अर्धशतक पाहून ही चाहती नक्कीच खुश झाली. तिच्या हातात एक पोस्टर होता. पोस्टरवर लिहिले होते की, “मी याठिकाणी विराट कोहलीसाठी आले आहे.” विराट फलंदाजीसाठी खेळपट्टीवर आल्यानंतर तिने हे पोस्टर उचांवले होते. तत्पूर्वी विराटने ग्रुप स्टेजमध्ये पाकिस्तान आणि हाँगकाँगविरुद्ध खेळताना अनुक्रमे 35 आणि 59* धावांची खेळी केली होती.
https://twitter.com/queen_rimmi/status/1566449552705867776?s=20&t=-TPwlWcmeEqQ7f2AycnvFQ
विराटने या सामन्यात केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने 7 विकेट्स गमावून 181 धावा केल्या. परंतु सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पंड्या आणि दीपक हुड्डा यांच्यातील एकही खेळाडू मोठी खेळी करू शकला नाही. यांच्यापैकी एखादा जरी खेळाडू मोठी खेळी करू शकला असता, तर पाकिस्तानसाठी विजय अधिक कठीण झाला असता. पाकिस्तानचा यष्टीरक्षक मोहम्मद रिजवान याने 71 धावा केल्या, तर मोहम्मद नवाज याने अष्टपैलू प्रदर्शन केले. नवाजने प्रथम गोलंदाजी करताना 4 षटकात 25 धावा दिल्या आणि 1 विकेट घेतली. तसेच फलंदाजी करताना त्याने 20 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 42 धावा केल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तान विरुद्धच्या पराभवामागचे कारण कॅप्टन रोहितने केले स्पष्ट; म्हणाला, ‘हार्दिक आणि पंतच्या विकेट…’
ज्याने हरवले, तोच मदतीला धावणार; भारताला फायनलमध्ये पोहोचवण्यासाठी पाकिस्तानची होणार हेल्प!!
हार्दिक अन् पंतवर खूपच तापला कर्णधार रोहित, ड्रेसिंग रूममध्ये संगठच काढला ‘जाळ अन् धूर’