Thursday, March 23, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“धोनीचे सर्वांवर बारकाईने लक्ष असते”, कार्तिकने ‘त्या’ गोष्टीचा केला गौप्यस्फोट

March 3, 2023
in टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter/ICC

Photo Courtesy: Twitter/ICC


जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा पुढील हंगाम मार्च महिन्याच्या अखेरीस सुरू होणार आहे. तत्पूर्वी, सर्व संघ तयारीला देखील लागले आहेत. आयपीएलमधील सर्वात प्रसिद्ध संघांपैकी एक असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघाने आपल्या काही प्रमुख खेळाडूंचे पॉडकास्ट रिलीज केले आहेत. संघाचा अनुभवी यष्टीरक्षक दिनेश कार्तिक याने या पॉडकास्टमध्ये एमएस धोनी याने आपले कौतुक केल्याचे म्हटले.

आरसीबीने रिलीज केलेल्या पॉडकास्टमध्ये कार्तिक याने धोनीने आपल्या समालोचनाचे कौतुक केल्याचे म्हटले. कार्तिक म्हणाला,

“मी ज्यावेळी समालोचन करत होतो त्यावेळी माझे अनेकांनी कौतुक केले. मात्र, त्यामध्ये असा एक व्यक्ती होता ज्याच्याकडून मला अजिबात अपेक्षा नव्हती. तो व्यक्ती एमएस धोनी होय. तो मला म्हणाला तू छान समालोचन करत आहे. मी तुझ्या समालोचनाचा आनंद घेतला. हा खरच माझ्यासाठी सुखद धक्का होता. मी त्याचे आभार मानले. तो नेहमीच खेळाच्या इतर बाबींवरही बारीक लक्ष देणारा व्यक्ती आहे.”

दिनेश कार्तिक याने 2021 मध्ये क्रिकेटपासून काही काळ दूर असताना समालोचन करण्यास सुरुवात केली होती. त्याने इंग्लंडमध्ये आपल्या समालोचनाच्या कारकिर्दीची सुरुवात केलेली. द हंड्रेड लीगमध्येही तो समालोचन करताना दिसलेला. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्येही पहिल्या दोन सामन्यात तो समालोचन करताना दिसला होता.

आगामी आयपीएलमध्ये आरसीबीला त्याच्याकडून मोठी अपेक्षा असेल. मागील हंगामात त्याने अनेक सामन्यांमध्ये संघासाठी फिनिशरची भूमिका बजावली होती. त्यानंतर तो भारतीय संघात पुनरागमन करण्यात देखील यशस्वी ठरलेला.

(I Am Surprised When Dhoni Praised My Commentry Dinesh Karthik Revealed)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘या’ पंजाबी अभिनेत्रीवर आख्खं पाकिस्तान फिदा, पीएसएलमधील सामन्यादरम्यान चाहत्याची पोस्टरसोबत एन्ट्री
आदिल रशीदचा नाद पराक्रम! बांगलादेशविरुद्ध 4 विकेट्स घेताच ब्रॉडच्या विक्रमही काढला मोडीत, रेकॉर्ड पाहाच


Next Post
Photo Courtesy: Twitter/Kevin Pieterson

अखेर पीटरसनने घेतली पंतप्रधान मोदींची भेट! खास कॅप्शनसह पोस्ट केले छायाचित्र

Jasprit Bumrah

"आता त्याला विसरा" विश्वविजेत्या खेळाडूने बुमराहच्या कारकिर्दीवरच लावले प्रश्नचिन्ह

fOOTBALL

आमदार चषक स्पर्धेसाठी 16 संघ; शासकीय पॉलिटेक्निक मैदानावर होणार स्पर्धा

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143