---Advertisement---

दिल्लीचा सामना पाहून चिडलेला पाँटिंग, ३-४ रिमोटही तोडले होते, स्वत:च केलाय खुलासा

On: गुरूवार, एप्रिल 28, 2022 3:19 PM
Ricky-Ponting
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रदर्शन तसे साधारण राहिले असून ७ सामन्यांमध्ये ३ विजयांसह संघ गुणतालिकेत सध्या सातव्या क्रमांकावर आहे. दरम्यान दिल्लीने त्यांचा सातवा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध झाला. या सामन्यातील अखेरचे षटक नाट्यपूर्ण ठरले. या सामन्यादरम्यान संघाचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग क्वारंटाईनमध्ये होता. आता त्याने या सामन्यादरम्यान काय भावना होत्या, याबद्दल खुलासा केला आहे. 

दिल्ली संघाला या हंगामात बऱ्याच संकटांचा सामना करावा लागला. त्यांच्या २ खेळाडूंसह एकूण ६ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. तसेच संघातील मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगच्या कुटुंबातील एक सदस्यही कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्यामुळे पाँटिंगला काहीदिवस क्वारंटाईनमध्ये राहावे लागले. याचदरम्यान दिल्ली आणि राजस्थानमधील सामना झाला आणि या सामन्यात दिल्लीला अखेरच्या षटकात १५ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

तसेच याच सामन्यादरम्यान दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत, फलंदाजी प्रशिक्षक प्रविण आमरे पंचांनी नो बॉल न दिल्याबद्दल वाद घातनाही दिसले होते. ज्याच्या परिणामी पंतवर १०० टक्के सामना शुल्काचा दंड आणि आमरे यांच्यावर एका सामन्याच्या बंदीची कारवाई झाली.

आता या सामन्याबद्दल बोलताना पाँटिंग म्हणाला की, ‘मी तीन-चार रिमोट तोडले, तीन-चार पाण्याच्या बॉटल फेकल्या. जेव्हा तुम्ही प्रशिक्षक म्हणून खेळापासून दूर असता आणि गोष्टी नियंत्रित करू शकत नाही, तेव्हा खूप राग येतो. माझ्याबरोबरही असेच झाले. मी मेसेज पाठण्याचाही प्रयत्न केला होता.’

पाँटिंग पुढे म्हणाला, ‘मी यावर्षी पहिले पण हेच सांगितले होते की, ३६-३७ षटके आम्ही चांगला खेळ दाखवतो. पण केवळ दोन आणि तीन षटकांत आम्ही हलके सोडतो. हीच समस्या आहे, ज्यामुळे सामन्यात फरक पडतो. आम्ही केवळ पहिल्या टप्प्यातील चूका सुधारण्यावरच नाही, तर पुढे जाण्याचाही प्रयत्न करत आहोत. आमचा प्रवास कधी विजय, कधी पराभव असा राहिला आहे. आम्हाला थोडी लय मिळवण्याची गरज आहे.’

पाँटिंग म्हणाला, ‘आम्हाला सर्वांना विश्वास आहे आणि आम्हाला विश्वास ठेवावा लागणार आहे. आम्हाला उत्साहीत राहावे लागेल आणि सकारात्मक राहावे लागेल. जर आम्ही असे करण्यात यशस्वी झालो, तर नक्कीच आमच्यासाठी काही गोष्टी बदलतील.’ तसेच पाँटिंग म्हणाला, ‘आम्ही जेवढे कठोर प्रयत्न करू, तेवढेच पुढे जाऊ. आम्हाला सहजतेने पुढे जायचे आहे. जर आम्ही काही चांगले करत असू आणि त्याचीच पुनरावृत्ती करत राहू तर आम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील.’

दिल्लीचा पुढील सामना २८ एप्रिलला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध होणार आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या – 

‘ईश्वर म्हणतोय, मी तुम्हाला मदत करतो,’ हार्दिकची हैदराबादविरुद्धच्या रोमांचक विजयानंतर प्रतिक्रिया

मॅक्सवेलच्या लग्नाची पार्टी अन् आख्खा बेंगलोर संघ वऱ्हाडी! विराटनेही टीममेट्सबरोबर लावले ठुमके

राशिद खानचा दिसला ‘फिनिशर’ अंदाज! अखेरच्या षटकात ३ सिक्ससह केली धोनीची बरोबरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---